हाच खरा सुपर'हिरो'; जीवाची पर्वा न करता अभिनेत्यानं अज्ञाताचा वाचवला जीव

नेमकं काय घडलं? 

Updated: Aug 4, 2022, 01:26 PM IST
हाच खरा सुपर'हिरो'; जीवाची पर्वा न करता अभिनेत्यानं अज्ञाताचा वाचवला जीव  title=
Slumdog Millionaire fame actor Dev Patel risked his life to save a persons life

मुंबई : कलाकार फक्त मनोरंजनच करतात असा जर तुमचा समज असेल तर तसं नाहीये. कारण समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखत हेच कलाकार बऱ्याचदा असं काही करून जातात की त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतं. सध्या अशाच एका अभिनेत्याच्या कामगिरीची जागतिक स्तरावर दखल घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. (Slumdog Millionaire fame actor Dev Patel risked his life to save a persons life)

'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटातील देव पटेल हा अभिनेता तुम्हाला माहितीये? हाच अभिनेता आताच्या घडीला सोशल मीडियावर खऱ्या आयुष्यातील सुपरहिरो ठरत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका अज्ञाताचा जीव वाचवण्यासाठी देवनं त्याचंही आयुष्य धोक्यात टाकल्याच्या चर्चा आहेत. 

नेमकं काय घडलं? 
ही घटना 2 ऑगस्ट रोजी घडली. देव पटेल ऑस्ट्रेलियात राहतो. तिथेच तो आपल्या काही मित्रांसोबत काही सामान खरेदी करण्यासाठी गेला होता. तिथेच जवळ एका जोडी भांडत होती. हा वादज इतका विकोपास गेला की, त्यांच्यात चाकू- सुऱ्यांचा वापर केला जाऊ लागला. तिथे असणाऱ्या महिलेनं पुरुषाच्या छातीवरच सुरीनं वार केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dev Patel (@devpatelit)

हे पाहताच देव आणि त्याच्या मित्रांनी तिथे धाव घेतली. देवनं आपला जीव धोक्यात टाकत त्या व्यक्तीला वाचवलं. त्यानं या पुरुषाला तोपर्यंत सांभाळलं जोपर्यंत घटनास्थळी पोलीस दाखल झाले नाहीत. देवचा या घटनेदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हे पाहून चाहतेही देवचं तोंड भरून कौतुक करत आहेत. अनेकांनी तर हाच खऱाखुरा सुपरहिरो असं म्हणतही देवची प्रशंसा केली आहे.