तैमुर आणि इनायाला मिळणाऱ्या प्रसिद्धीची सोहाला काळजी

 'माध्यमांद्वारे मिळणाऱ्या अशा प्रसिद्धीपासूनही त्यांना दूर ठेवण गरजेच आहे.  हे तैमूरच्या बाबतीत खूप होतय.'

Updated: May 14, 2018, 08:50 AM IST
तैमुर आणि इनायाला मिळणाऱ्या प्रसिद्धीची सोहाला काळजी
मुंबई : तैमुर अली खान हा सैफिनापेक्षा इंटरनेटवर अधिक लोकप्रिय आहे. त्याचा निरागस चेहरा अनेकांना अवडतो. आता तैमुरच्या बरोबरीने त्याच्या आतेबहिणेचीही फोटो सोशलमीडियावर व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे.  पण या दोघांना मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल सोला अली खानने भिती व्यक्त केली आहे. हे दोघेही अजून लहान असून त्यांना प्रायवसी देणं गरजेच असल्याच तिच म्हणणं आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सोहा म्हणते, 'दर्शकांच्या नजरेत राहण आमच्या कामाचा एक भाग आहे पण हे आमच्या मुलांसाठी लागू होत नाही. पण माध्यमांद्वारे मिळणाऱ्या अशा प्रसिद्धीपासूनही त्यांना दूर ठेवण गरजेच आहे.  हे तैमूरच्या बाबतीत खूप होतय. लहानपण हे पूर्णपणे निरागसतेने भरलेले असत. मला वाटत ते त्यांच्यापासून आपण खेचून घ्यायला नको. त्यांना देखील प्रायवसीचा अधिकार आहे आणि माध्यमांनी त्याचा सन्मान ठेवला पाहिजे.'

इनाया आणि तैमुर 

 

Carpooling! 

A post shared by Soha (@sakpataudi) on

सैफची बहिण म्हणजेच सोहा अली खानची मुलगी अवघ्या काही महिन्यांची आहे. तैमुर आणि इनायामध्ये अगदीच काही महिन्यांचं अंतर आहे. त्यामुळे या दोघांमुळे घरात दंगामस्ती होणं सहाजिकच आहे. मात्र सैफ आणि सोहा या दोघांना एकत्र ठेवायला घाबरतात अशी माहिती नुकतीच सोहाने एका मुलाखतीमध्ये दिली आहे. 

का घाबरतात सैफ आणि सोहा? 

तैमुर दिसयला गोंडस आणि खेळकर आहे. मात्र तो ज्या वयाच्या ट्प्प्यात आहेत त्यामध्ये तो रिअ‍ॅक्ट करायला शिकत आहे. त्याच्या हाताची पकड घट्ट होत आहे. तैमुर आता दिसेल ती गोष्ट फेकायला लागला आहे. ओरखडे काढायला लागला आहे. अशी माहिती सोहाने दिली आहे. तैमुरच्या या वागणुकीमुळेच सैफ नाजूक इनायाला त्याच्यापासून लांब ठेवणंच पसंत करतो. तैमुर आणि इनायाला फार काळ एकटं आणि एकत्र ठेवणं धोक्याचं असल्याचे सोहा गंमतीने म्हणाली आहे.  

सैफ आणि करिनाकडून टीप्स 

सैफ आणि करिना  वेळोवेळी आम्हांला पॅरेन्टिंग टीप्स देतात.  त्यामुळे इनाया आणि तैमुरला सांभाळणं सोपं होतं. तैमुर आणि इनायामध्ये अवघ्या काही महिन्यांचा फरक आहे. यामुळे तैमुरमध्ये होणारे बदल पाहून इनायासाठी आम्ही तयार राहतो असेही सोहा म्हणाली. सैफ आणि सोहा यांच्यामध्ये 8 वर्षांचा फरक आहे. पण तैमुर आणि इनायामध्ये केवळ काही महिन्यांचा फरक असल्याने ते एकमेकांचे चांगले मित्र होतील, भविष्यात तैमुर इनायाचा प्रोटेक्टिव्ह भाऊ होईल अशी इच्छा सोहाने व्यक्त केली आहे.