मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा स्तब्ध झालं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक समारंभ पुढे ढकलण्यात आली. पण हा कोरोनाचा कालावधी नेमका किती असणार हे सांगण कठीण झालं आहे. असं असताना कोरोनाचे सर्व नियम पाळून कमी कमी लोकांमध्ये अनेक कलाकार आपलं लग्न उरकून घेताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दुबईत लग्न केलं आहे.
सोनालीने आपल्या 33 व्या वाढदिवसाचे निमित्त साधल आपल्या लग्नाची माहिती जाहीर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला. 7 मे रोजी सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरूवात केली आहे. सोनालीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लॉकडाऊनमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. युकेमध्ये या दोघांचे लग्न होणार होते. पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. अखेर दुबईच्याच मंदिरात चार लोकांच्या साक्षीने सोनाली लग्नबंधनात अडकली आहे.
सोनाली आणि कुणाल दोघांच्याही आई-वडिलांनी ऑनलाईन पद्धतीने आशिर्वाद देत शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनालीने आपल्या सुखी संसाराला दुबईतून सुरूवात केली. लॉकडाऊनमध्ये अनेकदा सोनालीने किचनमधील व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच अनेक फोटो देखील पोस्ट केले आहेत. यावरून सोनालीचं नवं आलिशान घर पाहायला मिळत आहे.