सनी देओल आणि माधुरीने 'त्रिदेव' नंतर कधीच केलं नाही एकत्र काम, जाणून घ्या कारण

1990मध्ये 'त्रिदेव'ने तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले.

Updated: May 20, 2021, 01:12 PM IST
सनी देओल आणि माधुरीने 'त्रिदेव' नंतर कधीच केलं नाही एकत्र काम, जाणून घ्या कारण

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक जोड्या चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये असतात. जर एखादी जोडी बॉक्सऑफिसवर हिट ठरली तर सतत ती जोडी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसते. अशाच काही जोड्या आहेत ज्या प्रेक्षकांना खूप आवडतात पण त्या जोड्या एका  सिनेमानंतर पुन्हा पडद्यावर दिसत नाहीत. अशीच एक जोडी म्हणजे सनी देओल आणि माधुरी दीक्षित जी चाहत्यांना चांगलीच आवडली होती पण चित्रपटांमध्ये पुन्हा दिसली नाही.

'त्रिदेव' या सुपरहिट चित्रपटात माधुरी दीक्षित आणि सनी देओलची जोडी एकदाच दिसली. या चित्रपटात त्यांच्या व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, नसीरुद्दीन शाह, संगीता बिजलानी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला, ही जोडीही हिट झाली.

1990मध्ये 'त्रिदेव'ने तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. असं असूनही माधुरी आणि सनीची जोडी कधीही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली नाही. सनी देओलचे चित्रपट चाहत्यांना आवडायचे पण त्यांच्या चित्रपटांची स्टाईल फक्त अॅक्शनपुरती मर्यादित होती.

तर माधुरी प्रत्येक स्टाईलमध्ये अग्रगण्य होती डान्स, कॉमेडी, कौटुंबिक नाटक, असे सगळे चित्रपट ती करायची. त्यामुळे, तिच्याकडे सनीबरोबर काम करण्यासाठी मर्यादित पर्यायच होते. त्याचवेळी, सनी देओल व्यतिरिक्त संजय दत्त, अनिल कपूर, सलमान खान यांच्यासारखे कलाकारही चित्रपटसृष्टीत होते.

जे सगळ्या प्रकारच्या चित्रपटात काम करायचे. यामुळे माधुरीकडे सनीपेक्षा या कलाकारांसोबत काम करायचे पर्याय जास्त होते आणि त्यांच्याबरोबर माधुरीने बर्‍याच चित्रपटांमध्ये कामही केलं. जरी सनी देओल आणि माधुरीने एका चित्रपटातच एकत्र काम केलं असलं तरीही हे

दोघे अजूनही चांगले मित्र आहेत. काही काळापूर्वी हे दोघेही एका डान्स रिअॅलिटी शोच्या स्टेजवर एकत्र दिसले होते आणि यावेळी दोघांनीही त्यांच्या 'त्रिदेव' चित्रपटाच्या गाण्यावर डान्स केला होता