मुंबई : सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनालीच्या तब्बेतीची माहिती आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे फोटो आणि व्हिडिओ बघून चाहते खूप हैराण झाले. सोनालीचा मुलगा रणवीर बहलvs आताच 13 वा वाढदिवस साजरा केला. रणवीरचा हा पहिला वाढदिवस आहे जो त्याने त्याच्या आईशिवाय म्हणजे सोनाली शिवाय साजरा केला. त्यानंतर रणवीरने इंस्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली.
रणवीरने अगदी इमोशनल पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने चारही बाजूंना लाइटची रिंग घेतली. ही रिंग पॉझिटिव्ह संदेश देणारी आहे. रणवीरने हा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, तुम्ही सगळ्यांनी माझ्या चारही बाजूंना प्रकाश करून घर बनवलं आहे. मी तुमचा आभारी आहे. मला इतका चांगला सपोर्ट केल्यामुळे.
या अगोदर सोनालीने रणवीरच्या वाढदिवशी एक पोस्ट लिहीली होती. Ranveeeeer! मेरा सूरज, मेरे चांद, मेरे तारे, मेरे आकाश... ठीक है, शायद मैं थोड़ी मेलोड्रामाटिक हूं लेकिन आपका 13वां जन्मदिन इसका हकदार है। वाह, अब आप एक टीनेजर हैं ...इस बात के लिए मुझे खुद को मानने के लिए कुछ समय चाहिए। अशी पोस्ट लिहून सोनालीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.