सोनाली बेंद्रने भोगल्या कर्करोगाच्या यातना, बेडवरचा तो फोटो शेअर करत म्हणाली...

सोनाली कायम फोटो व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना प्रेरित करण्याता प्रयत्न करते. 

Updated: Jun 7, 2021, 09:30 AM IST
सोनाली बेंद्रने भोगल्या कर्करोगाच्या यातना, बेडवरचा तो फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोनाली कायम फोटो व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना प्रेरित करण्याता प्रयत्न करते. आता देखील सोनालीने  'कँसर सर्वायवर्स डे'च्या निमित्ताने स्वतःचा एक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोनालीने सोशल मीडियावर एक अत्यंत बोलकी पोस्ट शेअर केली आहे. कर्करोगाने ग्रासलेल्या सोनालीवर जेव्हा उपचार सुरू होते, तेव्हाचा एक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कर्करोगामुळे यातना भेगत असलेल्या सोनालीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोनालीने दोन फोटोंचा कोलाज तयार केला आहे. ज्यामध्ये एक फोटो उपचारादरम्यानचा आहे, तर एक फोटो आताचा आहे. एक फोटोमध्ये सोनाली बेडवर झोपलेली दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये कर्करोगाला मात दिलेली सोनाली आपल्याला दिसत आहे. सोनालीने कर्करोगाची ही लढाई जिंकली आहे. पाहा सोनाली शेअर केलेला फोटो...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'वेळ निघून जाते, जेव्हा मी मागे वळून पाहाते तेव्हा मला माझ्यातली ताकत दिसते. मला अशक्तपणा दिसतो, पण तो 'C'शब्द काही ठरवू शकत नाही की पुढे माझं आयुष्य कसं असेल. तु्म्ही असं जीनव जगता ज्याची निवड तुम्ही केली आहे. प्रवास तो असतो जो तुम्ही करता... ' असं लिहित तिने #OneDayAtATime आणि #SwitchOnTheSunshine असं हॅशटॅग देखील दिले आहेत.