'सोनू के टीटू की स्वीटी' १०० कोटी क्लबमध्ये, किती एकूण कमाई ?

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७० कोटी रुपयांहून जास्त कमाई केलीय.  वर्ल्ड वाइड या सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केलाय.  

Updated: Mar 8, 2018, 12:03 PM IST
'सोनू के टीटू की स्वीटी' १०० कोटी क्लबमध्ये, किती एकूण कमाई ? title=

मुंबई : लव राजन दिग्दर्शित 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतील पडत आहे. 

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७० कोटी रुपयांहून जास्त कमाई केलीय.  वर्ल्ड वाइड या सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केलाय.  

सिनेमाची कहाणी 

सिनेमात कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाची कहाणी दोन मित्रांची... ज्यातल्या एकाला 'परफेक्ट गर्लफ्रेंड' सापडलीय... तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा आहे... आता दुसऱ्या मित्राला मात्र ही गर्लफ्रेंड खोटी वाटतेय.

 'प्यार का पंचनामा' आणि 'प्यार का पंचनामा 2'ची टीम पुन्हा एकत्र आल्यावर स्क्रिनवर काय दिसू शकतं, याची एक झलक म्हणजे हा सिनेमा असे म्हटले जातेय. 

१०० कोटी क्लबमध्ये सिनेमा 

'सोनू के टीटू की स्वीटी'ने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली. १२ व्या दिवशी भारतामध्ये २.६२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

 त्यानंतर एकूण ७०.६७ कोटी रुपये कमाई झाली. तर जगभरात मिळून १०० कोटी ३३ लाख रुपयांचा आकडा पार केला.