अक्षयच्या मिठीत Katrina असतानाच; कपिल शर्मानं हळूच काय केलं पाहा

अक्षय कुमार Katrina सोबत Romance करत असतानाच... 

Updated: Nov 2, 2021, 05:29 PM IST
अक्षयच्या मिठीत Katrina असतानाच; कपिल शर्मानं हळूच काय केलं पाहा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या साहसासाठी ओळखला जातो. चित्रपटांमध्येही काही थरारक दृश्यांना पुरेपूर न्याय देण्यासाठीच त्याची अधिक ओळख. पण, हाच खिलाडी कुमार रोमँटीक अंदाजात आल्यावरही प्रेक्षकांची मनं जिंकतो. आता मात्र त्याचा हा रोमँटीक अंदाज आता अडचणींना आमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

कारण, एका अभिनेत्रीसोबत अक्षय रोमॅन्स करताना दिसला आणि तिथे नेमक्या त्याच वेळी आलेल्या विनोदवीर कपिल शर्माला धक्काच बसला. 

सध्या अक्षय आणि कतरिना त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र दिसत आहेत. अशाच एका कार्यक्रमाला त्यांनी नुकतीच हजेरी लावली. हा कार्यक्रम होता, 'द कपिल शर्मा शो'. 

सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमातील काही 'बॅक स्टेज' व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले जात आहेत. अशाच एका फोटोमध्ये खिलाडी कुमारच्या मिठीत कतरिना कैफ असतानाच काहीतरी भलतंच घडल्याचं पाहायला मिळालं. 

बी टाऊनचे हे कलाकार रोमँटीक अंदाजात पोज देत असतानाच तिथं कपिल शर्मा आला आणि तो कतरिना, अक्षयकडे विचित्रपणे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव शब्दांतही मांडता येणार नाहीत असे होते. आता हे सारंकाही पाहून नेटकरीही शांत राहिले नाहीत. 

खिलाडी कुमार, कतरिनाच्या या रोमँटिक अंदावर कपिलची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच गाजली.