close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'सिटी ऑफ लव्ह'मध्ये प्रियंकाच्या दीराचा दिमाखदार लग्नसोहळा

जो जोनास आणि सोफी टर्नर विवाहबंधनात

Updated: Jul 4, 2019, 01:44 PM IST
'सिटी ऑफ लव्ह'मध्ये प्रियंकाच्या दीराचा दिमाखदार लग्नसोहळा

मुंबई : 'सिटी ऑफ लव' म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॅरिसमध्ये सोफी टर्नर आणि जो जोनास यांचा पुन्हा एकदा लग्नसोहळा पार पडला. २९ जून रोजी झालेल्या या लग्नसोहळ्यात त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार याशिवाय काही सेलिब्रेटीजनीही हजेरी लावली होती. जो जोनास हा प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनासचा भाऊ आहे.

जो जोनास आणि सोफी यांनी याआधी साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. परंतु हे लग्नाचे क्षण अधिक अविस्मरणीय करण्यासाठी त्यांनी आणखी एका विवाहसोहळ्याचं आयोजन केलं. या दोघांनीही बिलबोर्ड अवॉर्ड २०१९ नंतर लगेचच लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लास वेगासमधील लिटिल व्हाइट चॅपलमध्ये काही मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं होतं.

जो जोनास आणि सोफी टर्नर यांचा फ्रान्सच्या प्रसिद्ध Chateau de Torreau महालात लग्नसोहळा पार पडला. सोफी टर्नरने या लग्नसोहळ्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळत आहे. 

 
 
 
 

A post shared by Sophie Turner (@sophiet) on

सोफी आणि जो यांना पहिल्यांदा नोव्हेंबर २०१६ मध्ये pre-MTV Europe Music Awards मध्ये एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यांनी २०१७ मध्ये आपल्या नात्याला अधिकृत दुजोराही दिला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी साखरपुडा केला. आता हे दोघेही विवाहबंधनात अडकले असून त्यांनी आपल्या सहजीवनाची नवीन सुरुवात केली आहे.