संजय कपूरवर का भडकले श्रीदेवीचे चाहते?

श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूळ अवस्थेत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 26, 2018, 09:09 PM IST
संजय कपूरवर का भडकले श्रीदेवीचे चाहते?

मुंबई : श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूळ अवस्थेत आहे. 

असं असताना मात्र श्रीदेवीचा दीर म्हणजे बोनी कपूरचा भाऊ आणि अभिनेता ंजय कपूर सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. याचं कारण ही तसंच संतापजनक आहे. एका बाजूला कपूर कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी झाला असताना संजय कपूरने केलेलं कृत्य अतिशय धक्कादायक आहे. 

श्रीदेवीच्या निधनाची बातमी सर्वात प्रथम संजय कपूर यांनी दिली. तसेच श्रीदेवीला कोणत्याही हृदय विकाराचा त्रास नसल्याचं देखील संजय कपूर यांनी स्पष्ट केलं होतं. असं सगळं असताना संजय कपूर यांनी एक असं कृत्य केलं आहे. ज्यामुळे श्रीदेवीच्या चाहत्यांसह नेटीझन्सनी त्यांना धारेवर धरलं आहे.आणि सोशल मीडियावर त्यांना ट्रोल व्हावे लागले. 

 

Shaadi hangover #antumoh

A post shared by Sanjay Kapoor (@sanjaykapoor2500) on

संजय कपूर यांचा कारनामा 

संजय कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे.  ‘शादी हँगओवर’ असे कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी आॅरेंज कलरचा कुर्ता घातला आहे. संजय कपूरनी हा फोटो पोस्ट केला आणि श्रीदेवींचे चाहते संतापून उठले. याचे कारण म्हणजे, संजय यांनी काल हा फोटो शेअर केलेला आहे. श्रीदेवीचे पार्थिव दुबईत अडकून पडले असताना संजय कपूरला ‘शादी हँगओवर’ आठवावे, याचाच अनेकांना संताप आला.

युझर्सने केलं ट्रोल 

संजय कपूरच्या या फोटोवर नेटीझन्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.  ‘लगता है आपमें भावनाएं नहीं है. टाईम देखो पोस्ट का’, असे एका युजरने लिहिले. तसेच अनेकांनी संजय कपूर यांना वेळंच भान ठेवण्याचा देखील सल्ला दिला. संजय कपूरसह संपूर्ण कपूर कुटुंब भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी दुबईत गेले होते. श्रीदेवीही याच लग्न सोहळ्यासाठी दुबईत गेल्या होत्या. हा लग्न सोहळा आटोपून कपूर कुटुंबीय मुंबईला परतले. पण श्रीदेवी दुबईतच थांबल्या होत्या. दुबईच्याच एका हॉटेलात शनिवारी रात्री श्रीदेवींना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.