श्रीदेवी यामुळे होत्या टेन्शनमध्ये, श्रीदेवींच्या काकांनी केला खुलासा

चेन्नईमध्ये 11 मार्चला श्रीदेवींसाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी कुटुंबिया रवाना झाले आहेत. यासाठी बॉलिवूड आणि दक्षिणातील अनेक कलाकार पोहचण्याची शक्यता आहे. पण त्याआधी श्रीदेवींच्या काकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 11, 2018, 01:41 PM IST
श्रीदेवी यामुळे होत्या टेन्शनमध्ये, श्रीदेवींच्या काकांनी केला खुलासा title=

मुंबई : चेन्नईमध्ये 11 मार्चला श्रीदेवींसाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी कुटुंबिया रवाना झाले आहेत. यासाठी बॉलिवूड आणि दक्षिणातील अनेक कलाकार पोहचण्याची शक्यता आहे. पण त्याआधी श्रीदेवींच्या काकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

श्रीदेवींचे काका वेणूगोपाल रेड्डी यांनी खुलासा केला आहे की, श्रीदेवी खूप वेदना सहन करत होत्या. त्या जगासमोर फक्त आनंदी होत्या. पण आतून त्या अतिशय दुःखी होत्या. श्रीदेवीची आर्थिक स्थिती योग्य नव्हती.

एका तेलगू चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रेड्डी यांनी म्हटलं की, 'श्रीदेवींच्या जीवनात खूप दुःख होतं. ती आमच्या सर्वांसमोर हसायची पण आतून खूप दुःखी होती'.

श्रीदेवी खूप साऱ्या वेदना घेऊन या जगातून गेल्या. पती बोनी कपूर यांचा भरपूर पैसा अनेक चित्रपट नाही चालल्याने डुबले होते. यामुळेच बोनी कपूर यांनी तोटा भरुन काढण्यासाठी श्रीदेवींची अनेक मालमत्ता विकली होती. संपत्ती विकल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्या खूप अस्वस्थ होत्या.

पतीमुळे श्रीदेवी पुन्हा सिनेमाता आल्या

रेड्डी यांनी म्हटलं की, श्रीदेवी पुन्हा काम करण्यासाठी आल्या त्याचं कारण बोनी कपूर आहेत. कुटुंबांचा सांभाळ आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, त्यांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा नवीन डाव सुरू केला.

रेड्डी यांच्या आधी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील एका पत्रातून अनेक खुलासे केले आहेत. श्रीदेवी यांनी वयाच्या 4 वर्षांपासून कामाला सुरुवात केली. जीवनात त्यांनी खूप संघर्ष केला आहे.