मुंबई : रविवार २५ फेब्रुवारीचा दिवस हिंदी सिनेसृष्टीसाठी काळ्या दिवसाची सुरुवात ठरला. बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीचे वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत निधन झाले.
१९६३मध्ये जन्मलेल्या श्रीदेवीने १९६७मध्ये बालकलाकार म्हणून सुरुवात केली होती. २०१३मध्ये श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
श्रीदेवीने बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. दाक्षिणेतून आल्या असल्या तरी श्रीदेवींनी बॉलीवूडमध्ये मोठे स्थान निर्माण केले होते.
८०च्या दशकात श्रीदेवी बॉलीवूडमध्ये यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या. या काळात त्यांनी अनेक सिनेमे केले जे सुपरडुपरहिट ठरले. त्यामागे त्यांची जीवतोड मेहनतही होती.
चालबाज या सिनेमातील एक गाणे शूट करताना श्रीदेवीला अंगात १०३ ताप होता. यावेळी पावसात भिजतानाचे गाणे शूट करायचे होते. अंगात ताप असतानाही श्रीदेवी यांनी कामाला प्राधान्य दिले. १०३ ताप असतानाही त्यांनी पावसात भिजत न जाने कहाँ से आई है या गाण्याची शूटिंग केली होती.