नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनेत्रीला म्हणाला..'औकात में रह'

सिनेमात एकत्र काम करत असताना देखील नवाजुद्दीन अभिनेत्रीला असं का म्हणाला...  

Updated: Mar 28, 2021, 08:13 AM IST
नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनेत्रीला म्हणाला..'औकात में रह' title=

मुंबई : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दकीने स्वतःच्या अभिनय कौशल्याने आणि डायलॉग्सने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. तर सोशल मीडियावर आणि खाऱ्या आयुष्यात देखील त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सिद्दकीने त्याच्या अभिनयाने आणि विनोदी बुद्धीने चाहत्यांना वेड लावलं आहे. सध्या नवाजुद्दीन सिद्दकीचा म्यूझीक व्हिडिओ 'बारीश की जाए' तुफान चर्चेत आहे. त्याचबरोबर नवाजुद्दीन सिद्दकीचा आणखी व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. 

'बारीश की जाए' व्हिडिओ नुकताच  प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिद्दकी त्याची अभिनेत्री नेहा शर्माला धक्का देवून  मर्यादीत राहण्यास सांगत आहे. तर सिद्दकी असा का बोल्ला  असेल असा  प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल. सिद्दकीच्या या वाक्यामुळे व्हिडिओ तुफान व्हायरल  होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Sharma  (@nehasharmaofficial)

खुद्द नेहा शर्माने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अत्यंत विनोदी  अंदाजात हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यांचा हा विनोदी अंदाज चाहत्यांना दोखील आवडला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या आगामी सिनेमाच्या सेटवरील आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin आणि नेहा शर्मा (Neha Sharma) ही जोडी  'जोगीरा सारा रा रा' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात नवाजुद्दीन-नेहा यांच्या शिवाय संजय मिश्रा आणि मिमोह चक्रवर्ती यांची देखील मुख्य भुमिका असणार आहे.