close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'या' अभिनेत्रीच्या कारवर अकराव्या मजल्यावरून पडला दगड

व्हिडिओ व्हायरल...

Updated: Sep 18, 2019, 07:11 PM IST
'या' अभिनेत्रीच्या कारवर अकराव्या मजल्यावरून पडला दगड

मुंबई : टीव्ही विश्वातून मोठ्या पडद्याकडे वाटचाल करणारी अभिनेत्री मौनी रॉय चांगलीच भडकली आहे. ती मोठ्या दुर्घटनेतून वाचली आहे. अकराव्या मजल्यावरून तिच्या कारवर दगड पडला आहे. त्यांनंतर तिने अपघाताचा व्हिडिओ पोस्ट केला. तिचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दगड पडल्यामुळे तिच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. 

जुहू सिग्नलवर एक दगड मौनीच्या कारवर पडला. परंतू या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. तिच्या कारचे सन-रूफ मात्र तुटले आहे. त्यामुळे मौनीने मुंबई मेट्रोवर बेजबाबदाररित्या काम करत असल्याचा आरोप लावला आहे. 

मौनीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'कामासाठी जात असताना माझ्या कारवर अकराव्या मजल्यावरून एक दगड पडला. त्यावेळस तिथे कोणी असतं तर किती मोठं नुकसान झालं असतं. कोणाकडे काही उपाय आहे. मुंबई मेट्रोच्या या बेजबाबदार कृत्यासाठी काय केलं पाहिले?' असा प्रश्न उपस्थित करत ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. 

मौनी लवकरच 'मेड इन चायना' या चित्रपटात झळकणार आहे. विनोदी कथा असलेल्या चित्रपटामध्ये ती अभिनेता राजकुमार रायच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात परेश रावल, अमायरा दस्तूर, गजराज राव आणि सुमित व्यास देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.