प्रत्येकवेळी किस केल्यावर विद्याला ‘हा’ प्रश्न विचारायचा इम्रान हाश्मी

विद्या बालन आणि इम्रान हाश्मी या जोडी ‘घनचक्कर’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. वेगळ्या पठडीतल्या या सिनेमात दोघांचे अनेक किसींग सीन्सही होते.

Updated: Oct 5, 2017, 09:26 AM IST
प्रत्येकवेळी किस केल्यावर विद्याला ‘हा’ प्रश्न विचारायचा इम्रान हाश्मी  title=

मुंबई : विद्या बालन आणि इम्रान हाश्मी या जोडी ‘घनचक्कर’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. वेगळ्या पठडीतल्या या सिनेमात दोघांचे अनेक किसींग सीन्सही होते.

नुकत्याच एका कार्यक्रमात विद्याने त्या किसींग सीन्सबद्दल काही मजेदार खुलासे केले आहेत. विद्याने सांगितले की, इम्रान प्रत्येक किसींग सीननंतर एक विचित्र प्रश्न विचारायचा. विद्या नुकतीच नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा या शोमध्ये गेली होती. तिथेच गप्पांमध्ये तिने इम्रानबद्दलचे हे खुलासे केले आहेत. 

विद्याने सांगितले की, प्रत्येक किस सीन झाल्यावर इम्रान विचारायचा की, तुला काय वाटतं सिद्धार्थ(विद्याचा पती) हा किसींग पाहिल्यावर काय म्हणेल? तुला वाटतं का की, तो माझा पेमेंट चेक मला देईल?

विद्या म्हणाली की, ‘इम्रानला प्रत्येक किसींग सीननंतर केवळ सिद्धार्थची चिंता होती की, तो काय म्हणेल. मला नेहमीच विचार करत होते की, तो मला असे प्रश्न का विचारतो.

माधवन सोबतचा किस आठवत नाही-

विद्या तिच्या किसींगबाबत या शोमध्ये बोलत होती. तेव्हा तिने ‘गुरू’ सिनेमातील किसींग सीनचाही उल्लेख केला. ती म्हणाली, ‘जेव्हा गुरू सिनेमात माधवन मला किस करत होता, तेव्हा जोरदार पाऊस येत होता. मी व्हिलचेअरवर होती. त्यामुळे मला त्या सीनच्या जास्त गोष्टी आठवत नाहीत.