राजकुमार राव - श्रद्धा कपूरच्या 'स्त्री'ने रचला नवा रेकॉर्ड

कमाईसोबतच रचला हा विक्रम 

राजकुमार राव - श्रद्धा कपूरच्या 'स्त्री'ने रचला नवा रेकॉर्ड

मुंबई : यंदाच वर्ष अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी खास आहे. श्रद्धाच्या हॉरर कॉमेडी 'स्त्री' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सेंचुरी केली आहे. गेले 100 दिवस हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. 

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव या जोडीचा कुणीही, कधीही विचार केला नसेल. पण या जोडीने 'स्त्री' या सिनेमातून प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. श्रद्धाचं या सिनेमातून भरपूर कौतुक झालं आहे. 

तसेच 'स्त्री' हा सिनेमा यावर्षांचा सर्वात हिट सिनेमा ठरला आहे. कमी बजेट आणि कमी प्रमोशन केलेलं असतानाही या सिनेमाने प्रेक्षकांना थिएटर्समध्ये खेचून आणलं आहे. महत्वाची बाब म्हणजे श्रद्धाने स्वतःच्याच सिनेमाचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

जर कलेक्शनबद्दल बोलायाचं झालं तर श्रद्धाने 'एक विलेन' आणि 'एबीसीडी 2' या सिनेमांपेक्षा तिसऱ्या सिनेमात सर्वाधिक कमाई केली आहे. एक विलेनमध्ये श्रद्धा कपूर सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली. एबीसीडीमध्ये ती वरूण धवनसोबत दिसली तर 'स्त्री' सिनेमात श्रद्धा राजकुमार रावसोबत दिसली. 

श्रद्धा कपूरला पहिल्यांदाच राजकुमार रावसोबत पाहण्यात आल. या जोडीचा आतापर्यंत कुणीच विचार केला नव्हता. ही जोडी बॉक्स ऑफिसवर एवढी कमाल करेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. 

जवळपास 14 आठवडे हा सिनेमा सिनेमाघरात आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. एवढा दिवसांचा कालावाधी घेऊन सिनेमागृहात राहिलेला हा श्रद्धा कपूरचा पहिला सिनेमा आहे.

श्रद्धा कपूरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर आता तिच्याकडे चांगले प्रोजेक्ट आहे. श्रद्धा कपूर लवकरच बाहुबली फेम प्रभाससोबत एक्शन सिनेमा 'साहो'मध्ये लवकरच दिसणार आहे. 

तसेच तिच्याकडे बॅडमिंटन स्टार सायना नेहवालवरील बायोपिक देखील आहे. या दोन्ही सिनेमांबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ आहे. त्याचप्रमाणे 'छिछोरे' या सिनेमात सुशांत सिंह राजपूतसोबत दिसणार आहे.