सुनिल ग्रोव्हरला डेंगीची लागण

मुंबईत पावासाने धुमाकूळ घातल्यानंतर आता रोगराई वाढण्याची शक्यता दाट आहे.

Updated: Sep 1, 2017, 09:26 PM IST
सुनिल ग्रोव्हरला डेंगीची लागण

मुंबई : मुंबईत पावासाने धुमाकूळ घातल्यानंतर आता रोगराई वाढण्याची शक्यता दाट आहे.

अनेक साथीचे आजार डोकं वर काढणार ही शक्यता आहे. अभिनेता सुनील ग्रोव्हरलदेखील डेंगीने त्रस्त झाला आहे. कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरला डेंगी झाल्याचे तसेच त्यावरील उपचारांसाठी त्याला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. 

 कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर सुनील ग्रोव्हर कपिल सोबतच त्याच्या शोपासूनही दूर गेला होता. यानंतर तो स्वतःचा कॉमेडी शो घेऊन येईल अशी चर्चा होती. मात्र आजारपणामुळे अजून काही दिवस सुनील टेलिव्हिजनपासून दूर राहील अशी शक्यता आहे. एकीकडे सुनील ग्रोव्हरला डेंगीची लागण झाली आहे तर दुसरीकडे कपिल शर्मादेखील आजारपणामुळे टेलिव्हिजनपासून दूर गेला आहे. 'कपिल शर्मा कॉमेडी शो' बंद करण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे.