एका अभिनेत्याच्या ट्विटवरून सनी देओलच्या मानधनाची चर्चा कशी सुरू झाली? म्हणे...

KRK Tweet on Sunny Deol: सनी देओल याची चर्चा रंगलेली दिसते. त्यामुळे तो सतत प्रेक्षकांच्याच चर्चेत आहे यावेळी त्याच्या गदर 2 ची जोरात चर्चा रंगायला लागली आहे. परंतु यावेळी एका अभिनेत्याच्या ट्विटवरून सनी देओलच्या मानधनाची चर्चा सुरू झाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 26, 2023, 05:11 PM IST
एका अभिनेत्याच्या ट्विटवरून सनी देओलच्या मानधनाची चर्चा कशी सुरू झाली? म्हणे...  title=
sunny deol going to take 50 cr for his next film says krk tweet (Photo: Social Media)

Gadar 2 : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असताना आता चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या मानधनाची. सध्या एका लोकप्रिय अभिनेत्यानं ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं सनी देओलच्या मानधनाबद्दल लिहिलं आहे. यावेळी त्यानं सांगितले आहे की सनी देओल एका चित्रपट निर्मात्याला सनी देओल भेटला असून आता सनी देओल त्यासाठी बक्कळ मानधन घेणार आहे. तेव्हा चला पाहुया की नक्की हे प्रकरण आहे तरी काय?

2001 साली आलेल्या 'गदर'नं 2023 मध्ये अक्षरक्ष: धुमाकूळ घातला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. वयाच्या 65 व्या वर्षी म्हणजे सत्तरीच्या उबंरठ्यावर असणाऱ्या सनी देओलला मिळालेले हे यश पुर्णत: न भूतो न भविष्यति असेच आहे. यावेळी त्याला मिळालेले हे यश पाहून आता सनी देओलनं आपल्या मानधनात वाढ केल्याची चर्चा एका लोकप्रिय अभिनेत्याच्या ट्विटवरून झाली आहे. 

'गदर 2' या चित्रपटानं फार कमी कालावधीत चक्क 500 कोटी रूपयांचा गल्ला भरला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सनी देओल आणि अन्य कलाकारांनीही यावेळी तगडं मानधन घेतल्याची चर्चा आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपट समीक्षकांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातून हा चित्रपट देशभर लोकप्रिय होताना दिसतो आहे. अजूनही आता हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच भाव खातो आहे. KRK हा अभिनेता सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो आणि सोबतच त्याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही त्याची चर्चा आहे. बॉलिवूडवर तो अनेकदा ट्विट लिहिताना दिसतो. अनेकदा तो या ट्विटवरून बॉलिवूड टीका करताना दिसतो. यावेळीही त्यानं चक्क एक खळबळजनक दावा केला आहे. 

हेही वाचा : गौतमीचा नाद करायचा नाय! इतक्यांशी नावं जोडली पण नथीवर कोरलं 'हे' नाव

त्याला त्याच्या ट्विटसाठी अनेकदा सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात येते आणि आताही त्याला ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी त्याच्या ट्विटनं एकच खळबळ माजवून दिली आहे. तो म्हणतो आहे की, सनी देओल एका बड्या निर्मात्याला भेटून आला आहे आणि ते दोघं पुढच्या एका फिल्मसाठी एकत्र काम करणार आहेत. यासाठी सनी देओल चक्क 50 कोटी रूपये घेणार आहे.