सनी लियोनीने खरेदी केली T20 ची ही टीम!

आयपीएल संपले असले तरी त्यातील अनेक चढ-उतार प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात असतील.

Updated: Jun 8, 2018, 11:50 AM IST
सनी लियोनीने खरेदी केली T20 ची ही टीम! title=

मुंबई : आयपीएल संपले असले तरी त्यातील अनेक चढ-उतार प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात असतील. अनेक भल्या भल्या टीम्स येथे हरताना पाहायला मिळाल्या तर अपेक्षित नसतानाही काही टीम्सने चांगली कामगिरी केली. टीम मालकांचे विश्वासू खेळाडू अपयशी झाले तर नव्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये नवे रेकार्ड बनवून आयपीएलच्या इतिहासात आपला ठसा उमटवला. या सर्व चढ-उतारांनंतर आयपीएलचे पर्व २७ मे ला संपले. यावर्षीचा आयपीएल किताब चेन्नई टीमने आपल्या नावे केला. हारलेल्या टीम मालकांना बसलेल्या धक्क्यातून ते सावरत असताना आता सनी लिओनी टीम खरेदी करणार असल्याची खबर समोर येत आहे.

आता सनी उतरणार मैदानात

सिनेसृष्टीतील हॉट आणि सेक्सी अभिनेत्री सनी लियोनीने आपल्या अदांनी करोडोंच्या मनावर मोहिनी घातली आहे. आता ती खेळाच्या मैदानात उतरणार आहे. प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे. याचा खुलासा खुद्द सनीने केला आहे. 

ही आहे सनीची टीम

सनीने खरेदी केलेल्या टीमचे नाव आहे चेन्नई स्वेगेर्स. याबद्दल बोलताना सनी म्हणाली की, क्रिकेट पाहणे मला खूप आवडते. त्यामुळे मी त्या खेळाला प्रोत्साहन देऊ इच्छिते. यामुळे मी टीम खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 
यावेळी सनीने चेन्नई टीमचे कौतुक केले. सनी म्हणाली की, शानदार कामगिरी करत या टीमने किताब आपल्या नावे केला. चेन्नई स्वगेर्स देखील अशीच कामगिरी करेल, असा विश्वास सनीने दाखवला.