'सुपर डान्सर सिझन 4' मधून शिल्पा शेट्टीची एक्झिट?

परिक्षक म्हणून शिल्पा शेट्टीला  'सुपर डांसर सिझन 4' या शोमधून बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.

Updated: Jul 20, 2021, 10:49 PM IST
'सुपर डान्सर सिझन 4' मधून शिल्पा शेट्टीची एक्झिट?  title=

मुंबई : डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डांसर सिझन 4' मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या शोमध्ये जज म्हणून दिसणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी मंगळवारी या शोच्या शूटिंगला पोहोचली नसल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार शिल्पा काही वैयक्तिक पर्सनल परिस्थितीमुळे येऊ शकली नाही. 

सोमवारी पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्ली-ल फिल्मच्या उद्योगात गुंतल्याबद्दल अटक केली. मीडिया रिपोर्टनुसार राज कुंद्राने अश्ली-ल फिल्ममध्ये बरीच गुंतवणूक केली होती आणि बराच नफाही मिळवत होता. बातमीनुसार, तपास यंत्रणा लवकरच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी करू शकतात. मात्र, डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर सीझन 4' बद्दल बोलायचं झालं तर शिल्पाबरोबर दिग्दर्शक अनुराग बासू आणि नृत्यदिग्दर्शक गीता कपूर हे जज म्हणूनही दिसतात.

जज म्हणून शिल्पा शेट्टीला या शोमधून बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. बातमीनुसार, अभिनेत्री करिश्मा कपूर मंगळवारी चित्रीकरणातील भागातील जज म्हणून सहभागी होणार आहे. या शोचं शूटिंग फिल्मसिटीमध्ये होणार होतं, पण राजच्या अटकेमुळे नाराज असलेल्या शिल्पाने शेवटच्या क्षणी शूटिंगला येण्यास नकार दिला. शोच्या निर्मात्यांनी शिल्पा ऐवजी करिश्मा कपूरसोबत शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. शिल्पाने याआधीही या शोला ब्रेक दिला होता. त्यावेळी मलायकाने जज म्हणून एंट्री घेतली होती. जर शिल्पाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शिल्पा लवकरच हंगामा 2 चित्रपटात दिसणार आहे.