मुंबई : कास्टिंग काऊच हे बॉलिवूडचं असं काळ सत्य आहे. ज्याबद्दल बोलणं मोठे कलाकार कायम टाळत असतात. आता तर कास्टिंग काऊच सारख्या अनेक गोष्टी समोर येत असतात. मात्र आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर बॉलिवूडमधल्या कास्टिंग काऊवर अगदी मोकळेपणाने बोलत आहे. स्वराने सांगितलं की, एका प्रोड्यूसरच्या असिस्टंटने Kiss करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वरा मुंबईला जाताना कास्टिंग काऊचच्या या प्रश्नाकरता कशी तयार होती हे देखील तिने सांगितलं.
स्वरा कास्टिंग काऊचबद्दल बोलली की, मी जेव्हा मुंबईला गेले तेव्हा याकरता मी तयार होते. कुणीतरी माझ्याकडे येईल आणि कास्टिंग काऊच म्हणजे कोणत्यातरी फेव्हरची मागणी करेल. तेव्हा मी ठरवलं होतं की, मी त्या व्यक्तीला काय काय ऐकवेन. मी तर फेमेनिज्मवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत वेगवेगळं स्पीच तयार केलं होतं. मात्र दीडवर्ष माझ्यासोबत असं काहीच झालं नाही. मात्र नंतर मला लक्षात आलं की, लोकं याबाबत सरळ बोलत नाहीत तर वेगळ्यापद्धतीने ते हिंट देतात.
स्वरा पुढे म्हणाली की, एक दिवस मी ऑफिसमध्ये होती. तेव्हा एक प्रोड्युसर माझ्याकडे आले आणि म्हणाले की, तुझ्यात बऱ्याच गोष्टी आहेत. तू रोलसाठी काय काय करू शकतेस? असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, सर मी सोशिओलॉजीची विद्यार्थी आहे. मला बंगाली भाषा येते. पंजाबीदेखील मी बोलू शकते. यावेळी ते सतत मला विचारत होते की, आणखी काय काय करू शकतेस? अखेर माझ्या लक्षात आलं आणि मी म्हटलं की, तुम्ही या रोलसाठी मला सेक्स करू शकतेस का? असं विचारत असाल तर मी नाही करू शकतं.
मी जेव्हा एका व्यक्तीकडे गेले तेव्हा ती व्यक्ती प्रोड्युसरचा असिस्टंट होता. तो मला म्हणाला की, मी तुला रोल देऊ शकतो. तेव्हा मी आजीला मॅसेज करत असताना त्याने माझ्या कानाला Kiss केलं आणि आय लव्ह यू बेबी... असं म्हणाला. आणि मी वळले तेव्हा माझे केस त्याच्या तोंडात होते. हे जर कास्टिंग काऊच असेल तर हो मी देखील याचा सामना केला आहे.