Swatantrya Veer Savarkar Day 2: रणदीप हुड्डाच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Swatantrya Veer Savarkar Day 2 : रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई... 

दिक्षा पाटील | Updated: Mar 24, 2024, 10:44 AM IST
Swatantrya Veer Savarkar Day 2: रणदीप हुड्डाच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई title=
(Photo Credit : Social Media)

Swatantrya Veer Savarkar Day 2 : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटाची कहानी आणि स्टार कास्ट लोकांना फार आवडली. एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र, चित्रपटाची पटकथा काही त्यांना आवडली नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया. 

रणदीत हुड्डा आणि अंकिता लोखंडेच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' नं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अपेक्षे पेक्षा कमी कमाई केली आहे. चित्रपटानं ओपनिंग डेला 1.15 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 2.25 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला चित्रपटाच्या मानधनात वाढ झाली आहे. पण जी अपेक्षा निर्मात्यांना होती ती पूर्ण झाली नाही. दररोज चित्रपटाची वाढती कमाई देखील पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणदीप आणि अंकिताच्या अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मनं

या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. तर रमदीप हुड्डानं वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. इतकंच नाही तर त्यानं या चित्रपटातून दिग्दर्शनात देखील पदार्पण केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टूडियोज आनंद पंडित, संदीप सिंह आणि योगेश राहर यांनी केली आहे. रणदीप हुड्डासोबत अंकिता लोखंडे आणि अमित सियालनं या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटात अंकितानं यमुनाबाई म्हणजेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटातील रणदीप आणि अंकिताचा अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  

चित्रपटाचं बजेट

या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. रणदीप हुड्डाच्या या चित्रपटाचं बजेट हे 20 ते 25 कोटी होती. दामोदर सावकर यांच्या भूमिकेसाठी रणदीपनं त्याचं 26 किलो वजन कमी केलं होतं. त्यानंतर रणदीप हुड्डा हा अक्षरक्षा: ओळखू येत नव्हता. या चित्रपटाला आयएमबीडीवर 7.3 रेटिंग्स मिळाले आहेत. शुक्रवारी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळू हळू त्याची पकड बनवत आहे.