'स्वीटी सातारकर'चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च

हा फुल्ल टू धम्माल ट्रेलर एकदा पाहाच...

Updated: Feb 21, 2020, 05:57 PM IST
'स्वीटी सातारकर'चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च

मुंबई : 'स्वीटी सातारकर' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांची चागंली पसंतीही मिळत आहे. चित्रपटात खटकेबाज संवाद, जबरदस्त संगीत पाहायला मिळतंय. 'तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते', 'साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय..' अशा खटकेबाज संवादांनी ट्रेलरमधून चित्रपट चांगलाच धम्माल असणार असल्याचं समजतंय. 

आगळीवेगळी प्रेमकहाणी, संवाद, संगीत यामुळे ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळतोय. 

 
 
 
 

हँडसम मिस्टर शेखर देणार का स्वीटी ला भाव? ते पिक्चर मध्ये कळणार तोपर्यंत ट्रेलर बघा ना राव..... #SweetySatarkarTrailer Out Now #SweetySatarkar #28Feb2020 @sweetysatarkarfilm Director: @the.shabbir.naik Writer: #SumitGiri Producer: #MunafNaik | @santoshmulekarmusic An AVK Distribution Release @khwabeeda_amruta | @sangramsamel | #vijaynikam123 | @vinamrabhabal | @vandana.sardesaiw | #GauriJadhav | @pushkarlonarkar | @snehalshidam | #YogeshDixit | #KomalYadav | #FaisalKhan | #SunilSingh | #mangeshkangane | #SushantSawant | #PrashantVichare | @aakashpendharkar | @sachin_narkar_swaroop |Sudhakar Omale | #RiyaTendulkar | @vikasPawar0310 |#HummingBees | @@mandar.pimple | @darshanmediaplanet | @avkentertainment19 | @rajshrimarathi | @vizualjunkies

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta) on

शब्बीर नाईक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. 

येत्या २८ फेब्रुवारीला 'स्वीटी सातारकर' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हलकीफुलकी कथा, उत्तम कलाकार, जबरदस्त संगीत असणारा 'स्वीटी सातारकर' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.