मुंबई : आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. आयुष्यातील पहिल्या गोष्टी खास असतात. त्यामुळेच पहिल्या गोष्टी कायमच आपल्या लक्षात राहतात. मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीच्या घरीदेखील असेच सेलिब्रेशन सुरू आहे.
स्वप्निल जोशीच्या घरी त्याच्या मुलांचं पहिलं रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात स्वप्निल आणि लीनाच्या आयुष्यात एका चिमुकल्याचं आगमन झाले. स्वप्निलच्या मुलाचं नाव राघव आहे. स्वप्निल जोशीला मोठी मुलगी मायरा आहे. यंदा मायरा आणि राघवचा पहिला रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. स्वप्निलने या सेलिब्रेशनचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वप्निलने या फोटोला 'पहिलं वहिलं' असे कॅप्शन दिले आहे.