रक्षाबंधनाच्या सणापूर्वी अर्जुन कपूरने बहिणींसाठी लिहली खास पोस्ट

श्रीदेवींच्या निधनानंतर अर्जुन कपूर त्याच्या सावत्र बहिणींच्या अधिकच जवळ आला आहे. 

Updated: Aug 26, 2018, 08:56 AM IST
रक्षाबंधनाच्या सणापूर्वी अर्जुन कपूरने बहिणींसाठी  लिहली खास पोस्ट  title=

मुंबई : श्रीदेवींच्या निधनानंतर अर्जुन कपूर त्याच्या सावत्र बहिणींच्या अधिकच जवळ आला आहे. अंशुला इतकाच तो जान्हवी आणि खुशी कपूरच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. यंदा रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच त्याने बहिणींसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबईत लॅक्मे फॅशन वीकचा सोहळा  

मुंबईत लॅक्मे फॅशन वीक 2018 ची धूम सुरू आहे. फॅशनच्या या झगमगत्या विश्वात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी रॅम्पवॉक केला. यामध्ये अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरचाही समावेश होता. 

लॅक्मे फॅशन वीक विंटर  फेस्टिवल 2018 मध्ये जान्हवी  नचिकेत बर्वेसाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरली होती. या सोहळ्याला अंशुला आणि खुशी कपूर सह त्यांच्या कुटुंबीयांनीही हजेरी लावली होती. जान्हवी कपूरचं रॅम्पवॉकवरही पदार्पण 

अर्जुन कपूरने लॅक्मे फॅशन वीकमध्ये हजेरी लावण्यासाठी आलेल्य अंशुला आणि खुशीचा एक फोटो शेअर केला आहे. मीडियाला फोटो देण्यासाठी या दोन्ही खास अंदाजात उभ्या होत्या. अर्जुनने हा फोटो केला आहे. 

अर्जुन कपूरची खास पोस्ट 

 

अर्जुनने फोटो शेअर करताना या दोघी खर्‍या शो स्टॉपर आहेत. जान्हवी, सोनम, रिया, हर्षवर्धन, मोहित आणि शनाया कपूर यांना पोस्टमध्ये टॅग करत त्याने आपल्या घरात 2 फॅशन रिबेल आहेत. असे लिहले आहे. तसेच या दोन्हींबद्दालही मला ईर्षा आणि अभिमान असल्याचं अर्जुनने लिहले आहे.