Taarak Mehta Fame Dilip Joshi : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीतील एक नाव म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). वर्षानुवर्षे ही मालिक प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जेठालाल ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली. आजही कित्येक प्रेक्षत ही मालिका केवळ जेठालाल (Jethalal Champaklal Gada) या पात्रासाठी बघत आहेत. हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकतेच एका मुलाखतीत चित्रपटातील भूमिकेसाठी वजन कसे कमी केले, याबद्दल एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे.
जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी एका वेब पोर्टलवर नुकीच भेट झाली. या मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला. यावेळी ते म्हणाले, " मी 1992 मध्ये एक गुजराती चित्रपट हुन हुनशी हुनशीलाल या सिनेमात मी काम करता होता. या चित्रपटात जवळपास 35-36 गाणी होती. राजकीय सटायर म्युझिकल फ्लिम होती. मला या सिनेमासाठी वजन कमी करण्यासाठी सांगितले होते. मी मरीन ड्राईव्हच्या एका स्विमिंग क्लबचा लाइफ टाईम मेंबर आहे. म्हणून वजन कमी करण्यासाठी कामावरुन परत येताना मी इथे स्कुटर पार्क करायचो, कपडे बदलायचो आणि 45 मिनिटातच मरीन ड्रायव्हला चक्कर मारायचो. म्हणूनच मी दीड महिन्यात 16 किलो वजन कमी करू शकलो."
सोशल मीडियाबद्दल दिलीप जोशी म्हणाले, "ती फार वेळ खाणारी गोष्ट आहे. सोशल मीडिया एक चांगले व्यासपीठ आहे, पण त्यासाठी मला वेळ मिळत नाही. लोक त्याचा गैरवापरही करतात. अनेकदा तर मी शो सोडत असल्याची अफवाही पसरवण्यात आली आहे. तसेच दिलीप जोशी म्हणाले, "जेव्हा मला शो ऑफर झाला तेव्हा चंपकलाल किंवा जेठालाल यापैकी एक भूमिका निवडायची होती. मी स्क्रिप्ट वाचली आणि मला समजले की मी चंपकलालच्या भूमिकेत बसणार नाही. त्यामुळेच मी जेठालालची भूमिका करण्याचा निर्णय घेतला. या भूमिकेसाठी मला निवडले त्याबाबत मी निर्माता असित मोदी यांचे सदैव आभारी राहीन'.
दिलीप जोशी यांनी सलमानच्या 'मैने प्यार किया'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दिलीप यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे. एकेकाळी बॅकस्टेज या नाटकात काम करणारे दिलीप जोशी एका एपिसोडसाठी तब्बल एक लाख रुपये मानधन घेतात.