TMOC : अंजली भाभीच्या सिजलिंग लूकने चाहत्यांना लावलं वेड... पाहा फोटो

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोचे घराघरात चहाते आहेत.

Updated: Sep 25, 2021, 01:57 PM IST
TMOC : अंजली भाभीच्या सिजलिंग लूकने चाहत्यांना लावलं वेड... पाहा फोटो

मुंबई : छोट्या पडद्यावरील टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' खूप प्रसिद्ध आहे. घराघरात चालणाऱ्या या शोचे खूपच जास्त चहाते आहेत. या शोमधील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. ज्यामुळे दया भाभी आणि जेठालाला व्यतिरिक्त इतर कलाकारांचे देखील वेगळा फॅनफॉलोइंग आहे.

या शोमध्ये 'अंजली भाभी' ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनैना फौजदार देखील सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. सुनैना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि रोज तिच्या चाहत्यांसाठी ती मनोरंजक पोस्ट शेअर करत असते.

सध्या सुनैना सोशल मीडियावर चर्चेचे कारण बनली आहे ते तिच्या फोटोंमुळे. सुनैना फौजदारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती एक सुंदर हिरवा ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

नेहमी शोमध्ये ड्रेसमध्ये दिसणाऱ्या आणि साध्या सगळ अंजली भाभीला अशा बोल्ड लूकमध्ये पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे आणि चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.
म्हणूनच तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे फोटो शेअर करताना सुनैना फौजदारने लिहिले - 'तुम उसे कभी बहका नहीं पाओगे क्योंकि वो एक समुंदर है।', म्हणजे तुम्ही त्याला कधीही फसवू शकणार नाही कारण तो समुद्र आहे.

सुनैनाच्या फोटोवर तिचे मित्र मैत्रिण देखील कमेंट करुन तिचे कौतुक करत आहे.