सर्वांना आवडणाऱ्या बबीतालाचं पुरूषांचा का एवढा राग, मुनमुन दत्ता म्हणाली...

2009 साली मुनमुन फार काही प्रसिद्ध नव्हती; पण...

Updated: Jun 19, 2021, 11:45 AM IST
सर्वांना आवडणाऱ्या बबीतालाचं पुरूषांचा का एवढा राग,  मुनमुन दत्ता म्हणाली...

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सर्वचं कलाकारांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. प्रेक्षक मालिकेतील कलाकारांना त्यांच्या नावाने नाही तर  मालिकेतील भूमिकेमुळे जास्त ओळखतात. मालिकेतील अशीचं एक व्यक्तीरेखा म्हणजे  बबीता अय्यर. गोकूळ धाम सोसायटीमध्ये तिला सर्व जण बबीता जी असं म्हणतात. बबीता सोसायटीमधील सर्वात बोल्ड महिला आहे. बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता.... खऱ्या आयुष्यात देखील मुनमुन प्रचंड हॉट आहे. 

आयुष्यात या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी मुनमुनने संकटांचा सामना केला. सांगायचं झालं तर 2009 साली मुनमुन फार काही प्रसिद्ध नव्हती. पण ती चर्चेत यायचं कारण म्हणजे अभिनेता अरमान कोहलीसोबत असलेलं नातं आणि नात्यात रंगलेला वाद. व्हेलेंटाइन्स डे दिवशी अरमानने आणि मुनमुन यांच्यात वाद झाले होते. तेव्हा अरमानने तिच्यावर हात देखील उरागला होता. 
 
त्यानंतर मुनमुन अरमानविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. तेव्हा अरमानला माफी मागावी लागली होती. त्याचप्रमाणे दंड देखील भरावा लागला होता. अरमान आणि मुनमुनचं नातं फार काळ टिकलं नाही. काही दिवसांतचं दोघे विभक्त झाले. 

दरम्यान मुनमुनने  #MeToo मोहिमे अंतर्गत वाईट अनुभव देखील सांगितला, 'प्रत्येक महिलेला एकदा तरी लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागतं. लहानपणी मी शेजारी राहणाऱ्या एका काकांना घाबरायची. मी जेव्हा त्यांना एकटी दिसायची ते मला घट्ट पकडाचे आणि हा प्रकार कोणाला सांगू नको असं म्हणत मला धमकी द्यायचे. त्यामुळे मला पुरूषांचा राग येतो.' असं मुनमुन म्हणाली.