close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'बॉयकट'मुळे ताहिरा ट्रोल; नेटकरी म्हणतात...

'इतके भाई-भाई जोक्स ऐकले की, आता...'

Updated: Jul 3, 2019, 10:02 AM IST
'बॉयकट'मुळे ताहिरा ट्रोल; नेटकरी म्हणतात...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिला गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सरचे निदान झाल्यापासून ती चर्चेत आहे. मात्र यावेळी ताहिराला ट्रोल करण्यात आल्याने ती चर्चेत आहे. कॅन्सरवर उपचार सुरु असल्यामुळे ताहिरा वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. तिच्या बॉयकट हेअर्समुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. ताहिरा आयुषमानचा भाऊ वाटत असल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं जात आहे. 

आयुषमान खुरानाचा 'आर्टिकल १५' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ताहिराही आयुषमानसोबत पोहचली होती. स्क्रिनिंगनंतर ताहिराने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी ताहिराला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर ताहिरानेही त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं.

 
 
 
 

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on

'इतके भाई-भाई जोक्स ऐकले की, आता कधीही मी आयुषमानला भेटते त्यावेळी बॅकग्राउंडला 'तू मेरा, तू मेरा भाई नही है' हे एकच गाणं वाजत असतं. तुम्ही आमच्या केसांची ठेवण पाहा? आहे ना वेगळी...' असं म्हणत तिने ट्रोलर्सला उपरोधिक उत्तर दिलं आहे. 

'भाई-भाई बोलण्यापासून वेळ मिळाला तर पाहा, की मी मंगळाहून, जमिनीवर आर्टिकल १५ पाहण्यास येण्यासाठी किती मेहनत घेतली आहे.' असं म्हणत तिने तिच्या कॅन्सवर कशाप्रकारे मात करत ती इथंपर्यंत येऊ शकली आहे, याचं गांभीर्य दाखवून दिलं. 

ताहिराला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तिच्यावर केमोथेरपी सुरु होती. या उपचारादरम्यान तिचे केस गेले. उपचारादरम्यान ताहिराचा बाल्ड लुक चांगलाच चर्चेत होता. याबाबतचा अनुभवही तिने शेअर केला होता. आता ताहिरा बॉयकट हेअरस्टाइलमध्ये दिसतेय. परंतु अनेकांनी तिच्या या लूकबाबत खिल्ली उडवत तिला ट्रोल केलं.