आधी नाईट ड्रेस, आता बाथरोबमध्येच बाहेर पडली करिना; नक्की चाललंय काय?

बॉलिवूड स्टार अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

Updated: Mar 22, 2022, 07:48 PM IST
 आधी नाईट ड्रेस, आता बाथरोबमध्येच बाहेर पडली करिना; नक्की चाललंय काय? title=

मुंबई : बॉलिवूड स्टार अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतीच ती तिच्या एका लूकमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  करीना प्रत्येकवेळी वेगळ्या आणि अनोख्या आउटफिटमध्ये दिसते. तिचे चाहते तिच्या बऱ्याच कपड्यांमधून प्रेरणा घेतात. आणि कधी-कधी असं घडतं की, करिना तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर ट्रोलही होते. यावेळीही असाच काहीसा प्रकार अभिनेत्रीबरोबर घडला आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

करिना दिसली नव्या लूकमध्ये 
करिनाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये करीना एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. करिनाचे हे फोटो वांद्रे येथील असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोंमध्ये करिना बाथरोबमध्ये दिसत आहे. काही लोकं करिनाला ट्रोल करतायेत तर काही चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षावही करतायेत.

करिनाचा आउटफिट पाहून लोकं आश्चर्यचकित
या फोटोंमध्ये करिनाचा आउटफिट पाहून लोकं आश्चर्यचकित झाले आहेत. काहीजण तिची प्रशंसा करत आहेत, तर काहींनी तिला जोरदार ट्रोल केल केलं आहे. या फोटोंमध्ये करिना बाथरोब आऊटफिमध्ये दिसत असून, चाहते फोटोवर कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.

एकीकडे करिनाचे चाहते तिच्या आउटफिटचं कौतुक करत असताना, ट्रोलर्स करीनाला या आउटफिटसाठी प्रचंड ट्रोलही करत आहेत. बॉलिवूडमध्ये करीना तिच्या अभिनयासोबतच तिच्या  फिटनेससाठीही ओळखली जाते. ज्यासाठी तिचे चाहते कौतुकही करत आहेत. या आधी करिना आणि करिश्मा नाईट ड्रेसमध्ये दिसल्या होत्या. ज्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता.