बोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त... करीना!

'मैं अपनी फेवरेट हूँ' म्हणणारी करीना... आज एक यशस्वी आई ठरतेय... करीनानं तिच्या लूक्सनी, अभिनयानं गेली काही वर्षं बॉलिवूडमध्ये गाजवली... या ग्लॅमरच्या इंडस्ट्रीत आई झाल्यावरही टिकून राहायचं असेल तर सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतो तो तुमचं दिसणं... आई झाल्यावर सहाजिकच शारीरिक, मानसिक बदल घडतात, बंधनं येतात... पण ते ओलांडून करीना जवळपास पुन्हा 'झिरो फिगर'च्या जवळ पोहोचलीय... नुकतंच तिनं एका मॅगझीनसाठी केलेलं फोटोशूट सेन्सेशनल ठरलंय.... करीना पुन्हा तिच्या जबरदस्त अंदाजात कमबॅक करायला सज्ज झालीय.

Updated: Jan 5, 2018, 02:59 PM IST
बोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त... करीना!

मुंबई : 'मैं अपनी फेवरेट हूँ' म्हणणारी करीना... आज एक यशस्वी आई ठरतेय... करीनानं तिच्या लूक्सनी, अभिनयानं गेली काही वर्षं बॉलिवूडमध्ये गाजवली... या ग्लॅमरच्या इंडस्ट्रीत आई झाल्यावरही टिकून राहायचं असेल तर सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतो तो तुमचं दिसणं... आई झाल्यावर सहाजिकच शारीरिक, मानसिक बदल घडतात, बंधनं येतात... पण ते ओलांडून करीना जवळपास पुन्हा 'झिरो फिगर'च्या जवळ पोहोचलीय... नुकतंच तिनं एका मॅगझीनसाठी केलेलं फोटोशूट सेन्सेशनल ठरलंय.... करीना पुन्हा तिच्या जबरदस्त अंदाजात कमबॅक करायला सज्ज झालीय.

मैं अपनी फेवरेट हूँ'... करीना कपूर हा डायलॉग अक्षरशः जगते... 'जब वी मेट'मधला हा डायलॉग म्हणजे तिनं लाखो मुलींना दिलेली प्रेरणाच... जब वी मेटला दहा वर्ष होऊन गेली तरी आज हा डायलॉग आणि करीना दोघेही टवटवीत आहेत. त्याचंच उदाहरण म्हणजे करीनानं नुकतंच केलेलं वोग मासिकासाठीचं फोटोशूट... 

या मॅगझिनसाठी केलेलं फोटोशूट सध्या इंटरनंटवरचं सेन्सेशन बनलंय... कुठल्याही हिरोईनसाठी असं फोटोशूट नवं नाही... पण आई झाल्यावरही इतका कॅरिस्मॅटिक अंदाज कदाचित करीनालाच जमलाय.

करीना आता तैमूरची आई झालीय... तैमूर एक वर्षाचा झालाय... गरोदरपणात वजन वाढणं स्वाभाविकच होतं... तसं तिचं वजन वीस किलोंनी वाढलंही... पण तैमूर एक वर्षाचा होईपर्यंत करीना परत जवळजवळ झिरो फिगरवर आलीय. त्यातूनच उठून दिसतं ते तिचं कामावरची निष्ठा, व्यायामावरचं प्रेम, तिची जिद्द आणि पुन्हा नव्यानं उभं राहण्याचा तिचा निश्चय... 

२००० साली रिफ्युजीमधून करीना बॉलिवूडच्या ग्लॅमर दुनियेत आली... कपूर घराणातल्या मुली सिनेमात काम करत नाहीत, हे करिष्मा आणि करीना या दोघी बहिणींनी मोडीत काढलं... जवळपास १२ वर्षांच्या कारकिर्दीनंतर जेव्हा करिश्माने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला तेव्हा करिना नावाचं बिनधास्त वादळ इंडस्ट्रीत आलं... करिश्मापेक्षा सक्षम कारकिर्द तिने घडवली. करिनाने आत्तापर्यंत सहा फिल्मफेअर पुरस्कारांवर नाव कोरलंय. करीना कपूर नावाच्या घराण्याचा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आली असली तरी बॉलिवूडमध्ये सिद्ध करण्यासाठी तिला सात वर्षे लागली... यादे, मै प्रेम की दिवानी हूं सारख्या सिनेमांत कचकड्याची बाहुली म्हणूनही ती वावरली... टशननं करीनाचा नवा लूक जगासमोर आणला... आणि तिथपासूनच फॅड सुरू झालं झिरो फिगरचं... सुरुवातीपासूनच ही बेबो तशी गोबऱ्या गोबऱ्या गुलाबी गालांची... पण झिरो फिगरवाल्या करीनाने अनेक जणांची बोलती बंद केली... आणि अनेक अभिनेत्रींना धसका घ्यायला भाग पाडलं. 

'जब वी मेट'नं खऱ्या अर्थानं करीनाला रिलॉन्च केलं... करीना प्रत्यक्ष जशी आहे, तशीच या सिनेमातली भूमिका होती... करिना खऱ्या अर्थाने स्टार झाली... 

करीनाचं वोगचं हे फोटो शूट जबरदस्त झालंय... करीनाची ही फिगर पचवायला जड गेलेल्यांनी तिला ट्रोल करणंही सुरु केलंय. पण करीना असल्या ट्रोल्सना भीक घालणाऱ्यातली नाही... त्या सगळ्यांची तोंडं कामानं गप्प करणाऱ्यातली ती आहे... आता ती तिच्या वीरे दी वेडिंगसाठी सज्ज होतेय... 

बोल्ड आणि ब्युटिफुल करीनाचे हे फोटो म्हणजे आत्ताच्या अभिनेत्रींना मिळालेला एक इशाराच... वीरे दी वेडिंगसाठी प्रंचंड मेहनत घेणाऱ्या करीनाचा हा चित्रपट हिट झाला, तर चित्रपटसृष्टीत नवीन ट्रेंड आणणारीही करीनाच असेल. जिथे लग्न झाल्यानंतर अभिनेत्रींना चित्रपट मिळवणं आणि हिट देणं अशक्य होतं, तिथे आई झाल्यानंतरही तरुण अभिनेत्रींना धसका घ्यायला लावणारी करीना पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत सगळ्यांना टशन द्यायला सज्ज झालीय.