असा असेल तापसीच्या स्वप्नातला राजकुमार

प्रत्येक मुलीच्या मनात तिच्या जीवनसाथीबद्दल एक अपेक्षा असते 

Updated: Nov 18, 2019, 06:28 PM IST
असा असेल तापसीच्या स्वप्नातला राजकुमार  title=

मुंबई : प्रत्येक मुलीच्या मनात तिच्या जीवनसाथीबद्दल एक अपेक्षा असते ती म्हणजे आपला पार्टनर 'असा' असावा.  करियर आणि रिलेशनशिप या दोन्ही गोष्टी सांभाळताना आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात. आपल्याला हवी असलेली गोष्ट सहजासहजी मिळत नाही. पण एकदा भेटली की ती आयुष्यभरासाठी आपली असते. 
 
करियरच्या वाट्यावर अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. 'पिंक', 'बेबी' असे एकापेक्षा एक चित्रपटात अव्हानात्मक चित्रपटं साकारणी अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल खुलासा केला आहे. 

तापसीने स्वत:च्या कौशल्याच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एका टॉक शोमध्ये तिला तिच्या जीवनसाथीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तापसनीने आपल्याला स्वावलंबी जीवनसाथी हवा असल्याचे सांगितले. 

'मी फक्त आणि फक्त मेहनत आणि जिद्दीच्या बळावर जीवनाच्या या टप्प्यावर पोहोचली आहे. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या मेहनतीचं फळ आहे. कलाविश्वात माझं कोणी गॉडफादर नाही. माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवलं आहे ते कोणाला फसवूण मिळवलं नाही.'

पुढे ती म्हणाली, 'म्हणून मला अशा मुलासोबत लग्न करायला आवडेल ज्याने स्वत:च्या बळावर आयुष्यात काही तरी साध्य केलं आहे आणि तो प्रामाणिक असला पाहिजे.' तापसीने तिच्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेक समस्यांना तोंड दिले आहे. 

आता तिच्या करियरचा वेग सतत चढत्याक्रमावर आहे. शिवाय तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता तापसीच्या स्वप्नातला राजकुमार तिला भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.