लोकप्रिय अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख जाहीर

सोशल मीडिया पोस्ट करत दिली याविषयीची माहिती   

Updated: Nov 21, 2019, 06:59 PM IST
लोकप्रिय अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख जाहीर
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कलाजगतात अनेक कारणांनी चर्चेत असणाऱ्या, आपल्या बोल्ड अंदाजामुळे कायमच चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आणि प्रकाशझोतात असणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी सर्वांच्या भेटीला आणली आहे. ही बातमी आहे, तिच्या लग्नाची. 

टेलिव्हिजन वर्तुळात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणारी आणि सध्याच्या घडीला अतिशय आनंदात असणारी ही अभिनेत्री आहे, काम्या पंजाबी. एखा खास अंदाजात काम्याने ट्विट करत तितकीच खास तारीख सर्वांसमोर आणली आहे. या तारखेचं जरा जास्तच महत्त्वं आहे, कारण काम्या याच दिवशी विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

शलभ या तिच्या प्रियकरासोबत काम्या तिचं नवं आयुष्य सुरू करण्य़ास सज्ज झाली आहे. त्यासोबतचाच एक फोटो शेअर करत तिने याचा उलगडा केला. '...तर, आज मी इथे माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीसोबतचा सर्वात आवडता फोटो शेअर करत आहे. एक खास तारीख आज मी जाहीर करत आहे. ती म्हणजे १० फेब्रुवारी २०२०. या दिवशी आमच्या नव्या प्रवासासाठी, एका नव्या सुरुवातीसाठी सदिच्छा द्या.....',असं तिने पोस्टमध्ये लिहिलं. 

शलभविषयी एका मुलाखतीत सांगताना आपण, सध्या जीवनातील अतिशय आनंददायी पर्वातून जात असल्याचं तिने सांगितलं होतं. शलभसोबतच्या नात्यात प्रेम, नात्यातील बहर, भावनिक स्थैर्य या सर्व गोष्टींची अनुभूती आपल्याला झाल्याचं तिने सांगितलं होतं. वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रथमच आपल्याला अशी अनुभूती झाल्याचं ती म्हणाली होती. अशा या सेलिब्रिटी जोडीचा विवाहसोहळा आता नेमका कुठे आणि कसा पार पडतो याचीच उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.