अभिनेत्रीनं केली टेलिव्हिजनची पोलखोल, म्हणाली, '14-15 काम करूनही...'

बॉलीवूड स्टारपेक्षा टेलिव्हिजन कलाकार हे जास्त व्यस्त आहे आणि याचा खुलासा स्वत: एका टीव्ही अभिनेत्रीने केला आहे.

Updated: Oct 9, 2022, 11:10 PM IST
अभिनेत्रीनं केली टेलिव्हिजनची पोलखोल, म्हणाली, '14-15 काम करूनही...' title=

Tina Dutta On Television: टेलिव्हिजन क्षेत्रात आज अनेक कलाकार सक्रिय आहेत. त्याचसोबत काही कलाकार प्रकाशझोतात येऊ शकले तर काही कलाकार येऊ शकले नाहीत. त्यातून अनेक कलाकारांना या क्षेत्रात येण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात काहींना यश येते तर काहींना अपयश. परंतु असेही अनेक कलाकार आहेत ज्यांना टेलिव्हिजन (Television) क्षेत्रात काम करताना अनेक वाईट अनुभवही आले आहेत. (television actress tina dutta opens up about television and work life)

बॉलीवूड स्टारपेक्षा टेलिव्हिजन कलाकार हे जास्त व्यस्त आहे आणि याचा खुलासा स्वत: एका टीव्ही अभिनेत्रीने केला आहे, या अभिनेत्रीनं अनेक सुपरहिट टीव्ही शो केले आहेत सध्या ही अभिनेत्री बिग बॉसमधून प्रेक्षकांनी केली आहे. परंतु सध्या तिच्या एका वक्तव्याने टीव्ही जगतात खळबळ उडाली आहे. ही अभिनेत्री आहे टीना दत्ता. (Tina Dutta) टीना दत्ता या अभिनेत्री सध्या एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

टीना दत्ता सध्या बिग बॉसमध्ये आहे. नुकतेच अंकित गुप्ता याच्याशी शोमध्ये बोलताना टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल तिनं आपलं मत व्यक्त केले. यासोबतच तिनं टीव्ही जगताशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टीही सांगितल्या आहेत. टीना दत्ताने सांगितले की, टीव्ही जगतात काम करणे अत्यंत कठीण आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील 14-15 तास सीरियलला देत असता. तुमच्याकडे तुमच्या कुटुंबालाही वेळ देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

आपला मुद्दा पुढे करत टीना म्हणते की शूटिंगमुळे लोकांचे वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे विस्कळीत होते. अनेक शूट्स इतके लांब असतात की तुमचे संपूर्ण शेड्यूल बिघडते तुम्हाला त्यातून वैयक्तिक वेळ काढता येत नाही. महिन्याभरात क्वचितच सुट्टी असते. कलाकारांचा सगळा वेळ सेटवरच जातो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बिग बॉसच्या अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी शोमध्ये बरेच तगडे स्पर्धक आले आहेत, जे प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन करताना दिसत आहेत. या आठवड्यात सलमाननं स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे.