'त्या' वक्तव्यानंतर जसलीन अनुप जलोटा यांच्यावर संतापली

जलोटा यांनी 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच काही खळबळजनक खुलासे केले होते  

Updated: Oct 31, 2018, 03:41 PM IST
'त्या' वक्तव्यानंतर जसलीन अनुप जलोटा यांच्यावर संतापली  title=

मुंबई : 'बिग बॉस'चं यंदाचं पर्व सुरु झाल्यापासूनच त्याच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. या साऱ्या चर्चांमध्ये विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाने. 

जसलीन मथारु हिच्यासोबत ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं या कार्यक्रमात दाखवण्यात आलं. पण, वास्तव मात्र वेगळच होतं. 

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर खुद्द जलोटा यांनीच याविषयीचा खुलासा केला. जसलीन ही आपली शिष्या असल्याचं म्हणत तिच्यासोबतच्या रिलेशनशिपच्या अफवा त्यांनी धुडकावून लावल्या. 

हे सर्व काही ठरवून केल्याचा गौप्यस्फोट करत आपल्याला कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात जसलीन ही माझी पार्टनर असल्याचं मला कळलं असं म्हणत जलोटा यांनी सर्वांचच लक्ष वेधलं. 

त्यांच्या या वक्तव्यानंतर 'बिग बॉस'च्या घराबाहेरच नव्हे तर घराच्या आतही बरीच उलथापालथ पाहाया मिळाली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी जसलीनला याची माहिती मिळाली तेव्हा तिने जलोटा यांच्यावर संताप व्यक्त केला. 

जसलीन आणि अनुप जलोटा यांच्या वयात जवळपास ३७ वर्षांचं अंतर असून, ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचं या कार्यक्रमात भासवण्यात आलं होतं. ज्यामुळे टीआरपी रेटींगच्या शर्यतीतलही 'बिग बॉस'ने चांगलाच वेग धरला होता. आता कार्यक्रमातील हे वळण आणि जलोटा यांच्या गौप्यस्फोटामुळे 'बिग बॉस'च्या घरात या साऱ्याचा काही परिणाम होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.