'या' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान गमावला असता शाहरुखने जीव

नेमकं काय झालं होतं?

'या' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान गमावला असता शाहरुखने जीव

मुंबई : बॉलिवूडच्या जगातला बादशाह अभिनेता शाहरूख खानने फिल्मी पडद्यावर आता 26 वर्षे पूर्ण केली आहे. एवढ्या मोठ्या काळात शाहरूख खानने स्वतःला किंग ऑफ बॉलिवूड म्हणून स्थापित केलं आहे. 1992 साली शाहरूख खानने  दीवाना या सिनेमातून डेब्यू केलं आहे. यानंतर एक एक उत्तम सिनेमे देऊन शाहरूख खानने प्रेक्षकांच मनोरंजन केलं. 

जवळपास 150 सिनेमांमध्ये काम केलेला शाहरूख खान करोडो लोकांच्या जीवावर राज्य करत आहे. पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत त्याची जोडी पसंत केली आहे. काजोल, माधुरी दीक्षितसोबत शाहरूख खानची जोडी अतिशय लोकप्रिय आहे. तसेच शाहरूख या वयातची रोमान्सचा किंग म्हणून ओळखला जातो. 

शाहरूख खानच्या लोकप्रिय सिनेमातील एक सिनेमा म्हणजे कोयला. या सिनेमात शाहरूख आणि माधुरीची जोडी हिट ठरली. भरपूर स्टंट असलेल्या या सिनेमात एक असा अपघात झाला ज्यामध्ये शाहरूख खानचा जीव देखील गेला असता. याचा खुलासा स्वतः शाहरूख खानने दिला आहे. 

कोयला सिनेमात एक असा सीन होता जेव्हा शाहरूखच्या शरीरावर आग लागली होती आणि तो धावत होता. हा खतरनाक स्टंट स्वतः शाहरूख खानने केला होता. या सीनकरता त्याने चेहऱ्यावर मास्क देखील लावला नव्हता. शाहरूखने फायरप्रूफ कपडे घातले होते तर वॉटर जेल देखील लावली होती. पण ही गोष्ट फक्त माणसाला 15 मिनिटेच वाचवू शकते. 

पुढे शाहरूख खानने सांगितलं की, त्यावेळी आगीचा झोत वाढला आणि त्याला त्रास होऊ लागला. त्यावेळा शाहरूख जमिनीवर पडला. तेव्हा लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर अनेक जाड चादरी टाकण्यात आल्या पण याचा काही फायदा झाला नाही. एका क्रू मेंबरला वाटलं की आता माझा चेहराच जळाला. त्याने कार्बन डाय ऑक्साइड माझ्या चेहऱ्यावर मारला. शाहरूख म्हणतो की हा माझ्या जीवनातील अतिशय घाणेरडा क्षण होता.