रवीना टंडन 'तेव्हा' दारूच्या नशेत? त्या क्षणी नेमकं काय घडलं? पोलिसांनी स्पष्टच सांगितलं...

Raveena Tandon : रवीना टंडन प्रकरणात आता पोलिसांनी केला खुलासा... गाडीची धडक ते अभिनेत्री दारूच्या नशेत असल्याच्या आरोपांवर पोलिस म्हणाले...

दिक्षा पाटील | Updated: Jun 3, 2024, 10:58 AM IST
रवीना टंडन 'तेव्हा' दारूच्या नशेत? त्या क्षणी नेमकं काय घडलं? पोलिसांनी स्पष्टच सांगितलं... title=
(Photo Credit : Social Media)

Raveena Tandon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या घरासमोर शनिवारी रात्री पार्किंगवरून वाद झाल्याचे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाले. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात लोकं रवीनाला धक्का देत असल्याचे आणि तिच्या ड्रायव्हरल मारहान करत असल्याचे दिसले.  त्यानंतर रविवारी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात जबाब नोंदवला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की दोन्ही बाजुच्या लोकांनी तक्रार करण्यास नकार दिला आहे. या घटनेत कोणाला काही दुखापत झालेली नाही. 

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात सांगितलं की रवीना टंडनचा ड्रायव्हर कारची पार्किंग करण्यासाठी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न करत होता आणि एका कुटुंबातील तीन लोकांना वाटलं की त्यांचा अपघात होईल. वाद झाल्यानंतर दोन्ही बाजुचे लोक हे गेले आणि त्या ठिकाणी पोलिस आले त्यानंतर त्यांनी रवीनाच्या कर्मचाऱ्यांशी या संबंधीत चौकशी केली. त्यानंतर त्या दुसऱ्या पक्षातील लोकांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. दोघांनी कोणही तक्रार करण्यास नकार दिला.'

मुंबई पोलिसांनी केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओनंतर आलं आहे. ज्याच रवीना टंडन लोकांना 'शांत रहा' असं सांगत होती आणि बोलत होती की 'मला मारू नका.' पोलिस रिपोर्टनुसार, ही घटना शनिवारी रात्री वांद्रेच्या कार्टर रोडवर झाली. दरम्यान, कोणतीही तक्रार किंवा एफआयआर दाखल करण्यात आली नाही. रवीनानं या घटनेवर अजून कोणतीही कमेंट केलेली नाही. व्हायरल व्हिडीओ प्रमाणे रवीनाच्या ड्रायव्हरनं तीन लोकांना धडक दिली. त्यानंतर तिथे लोकांचा जमाव झाला आणि ते तिच्यावर संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. 

हेही वाचा : बाप का पैसा, तू रोकेगा कैसा' पोर्श अपघातावर RJ मलिष्काचा रॅप Viral

रवीना टंडनवर नशेत असल्याचे आरोप लगावण्यात आले होते. त्या व्यक्तीनं रवीनावर आरोप केले की रवीनानं गाडीतून बाहेर येत महिलेवर हल्ला करण्यास सुरुवात केली. खार पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात दिसून आलं की कारनं कोणालाही धडक दिली नाही आणि रवीना ही मद्यधुंद अवस्थेत नव्हती. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासनीत एक गोष्ट स्पष्ट झाली की यात कोणालाही काही दुखापत झालेली नाही. तर या प्रकरणात दोन्ही पक्षांपैकी कोणी तक्रार दाखल केलेली नाही.