विकी-कतरिनाच्या साखरपुड्याच्या अफवांवर अभिनेत्याच्या भावाची प्रतिक्रिया...

विकी-कतरिनाच्या साखरपुड्याच्या फक्त अफवा असल्याचं सांगत सनीकडून मोठा खुलासा

Updated: Sep 22, 2021, 07:25 AM IST
विकी-कतरिनाच्या साखरपुड्याच्या अफवांवर अभिनेत्याच्या भावाची प्रतिक्रिया...

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. चाहत्यांना विकी आणि कतरिनाची जोडी देखील फार आवडली. त्यामुळे विकी आणि कतरिना लग्न कधी करणार असा प्रश्न चाहते सतत दोघांना विचारत आहे.  एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याची अफवा पसरली. पण अखेर ही फक्त एक अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

आता विकीचा भाऊ सनीने त्याच्या साखरपुड्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. Film Companion ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्यांचा साखरपुडा झाला नसल्याचं सांगत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, 'सर्वांना माहिती आहे की असं काही नाही. जेव्हा अफवा पसरली तेव्हा काही तासांतचं त्यांनी असं काही नसल्याचं सांगितलं. जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा माहिती साखरपुड्याची बातमी मिळाली..'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे  सनी म्हणाला, 'माझ्या लक्षात आहे. जेव्हा अफवा पसरली तेव्हा विकी जिमसाठी गेला. आल्यानंतर त्याला आम्ही विचारलं तुझा साखरपुडा झाला आहे. आम्हाला मिठाई दे. तेव्हा विकी म्हणाला साखरपुडा ज्याप्रमाणे झाला त्याप्रमाणे मिठाई खा...' दरम्यान विकी आणि कतरिनाच्या साखरपुड्याची तुफान चर्चा रंगली. 

विकीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तो भाऊ सनीसोबत 'शिद्दत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात राधिका मदान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.