ऑनलाइन ब्युटी प्रोडक्टस वापरणं 'या' अभिनेत्रीला पडलं महागात

का झालं असं?

ऑनलाइन ब्युटी प्रोडक्टस वापरणं 'या' अभिनेत्रीला पडलं महागात  title=

मुंबई : आज ऑनलाईन अनेक ब्युटी प्रोडक्टस मिळतात. पण या प्रोडक्टसवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. अशावेळी प्रोडक्ट सेलर वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन जाहिराती करतात आणि या प्रोडक्टमध्ये किती विश्वासार्हता आहे हे पटवून देतात. पण असं ऑनलाईन प्रोडक्ट खरेदी करून त्याचा वापर करणं एका लोकप्रिय अभिनेत्रीला महागात पडलं आहे. 

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आणि 'द कपिल शर्मा शो' सारख्या शोमध्ये कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी असलेली सुमोना चक्रवर्ती ही सध्या आपल्या स्किनमुळे अधिक चर्चेत आहे. ती सध्या आपल्या सोशल पोस्टमुळे चर्चेत आहे. कामाच्या गडबडीत सुमोनाला आपल्या रोजच्या पार्लरमध्ये जाता आलं नाही. त्यामुळे तिने एका जवळच्या ऑनलाईन ब्युटी पार्लरमधील सर्विसचा वापर करून वॅक्सिंग केलं. वॅक्सिंग केल्यानंतर तिच्या अंडर आर्मसखाली रॅशेस आल्याच समोर आलं. सुमोनाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपली व्यथा मांडली असून जागृकता देखील केली आहे. 

 

@urbanclap Never again  I actually decided to try out their waxing service primarily because of the urgency & not getting an appointment at my regular salon (JCB) Their shitty & pathetic service has bruised and left marks on my skin. BLOTCHED, BRUISED, PEELING SKIN. Instead of getting tanned on a beach, I sat n kept putting aloe gel all day avoiding the sun. A request to all social media influencers & to all the actors doing post’s on Instagram & various other social media platforms whether its free or paid, think twice before putting up a post. I was approached as well for doing an urban clap post for Insta. They didn't have the budget (which is okay) and i simply decided to try out their waxing service and this is the outcome. . The 1st pic is from Day 1 i.e 11th july'18 the 2nd is as of today i.e 17th july'18 P.s pls feel free to share! @urbanclap i hope u have the budget to train your so called professionals.

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सुमोनाने एक मोठी पोस्ट लिहिली आहे. आणि अगदी अडचणीच्या काळात वॅक्सिंग केल्यामुळे किती त्रास झाला हे तिने या पोस्टमध्ये मांडल आहे. वॅक्सिंगमुळे तिच्या स्कीनवर एवढी रॅश आल्याचं तिने सांगितलं आहे. 11 जुलैला तिने वॅक्सिंग केलं पण त्यानंतर तिला 17 जुलैला देखील त्याचा त्रास झाला असल्याचं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. तसेच यापुढे कुणीही ऑनलाईन ब्युटी प्रोडक्टस घेऊन आपल्या त्वचेची वाट लावू नये असं देखील तिने आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.