कतरिना कैफच्या आयुष्यात आलेलं हे दु:ख कुणाच्याही वाटेला येऊ नये...म्हणून असते ती शांत..शांत...

कॅटरिना हे दु:ख लहानपणापासून भोगत आलेली आहे...  

Updated: Dec 6, 2021, 12:00 PM IST
कतरिना कैफच्या आयुष्यात आलेलं हे दु:ख कुणाच्याही वाटेला येऊ नये...म्हणून असते ती शांत..शांत...

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तुफान चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसं आहे. कतरिना लवकरचं नव्या आयुष्याला सुरू करणार आहे. कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत लग्न करणार आहे. आता कतरिना प्रचंड आनंदी असली तरी लहानपणी शांत शांत असायची. त्याला कारण देखील तसं आहे. कतरिनाने एका मुलाखतीत वडिलांचा साथ न मिळाल्यामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागला... असं सांगितलं.

कतरिना लहान असताना तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आई वडील वेगळे झाल्यानंतर कतरिना तिच्या आईसोबत राहत होती. त्यामुळे तिला वडिलांचं प्रेम मिळालं नाही. कतरिना लहान असताना आई सुझान टरव्कॉट आणि वडील मोहम्मद कैफ वेगळे झाले. तेव्हा कतरिना म्हाणाली होती, 'माझ्या मुलांना आई-वडील' दोघांचं प्रेम मिळेल.'

कतरिनाच्या आईने एकट्या 8 मुलांचा सांभाळ केला आहे. कतरिना तिच्या कुटुंबासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता कतरिनाच्या आयुष्यात पतीच्या रूपात विकी कौशलची एन्ट्री होणार आहे. 

कतरिना कैफच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 

लव्हबर्ड्स हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करतील. 7 व 8 डिसेंबर रोजी संगीत व मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. दोघांच्या चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.