Sushant Suicide Case: ईडीच्या कारवाईनंतर रियाची पहिली प्रतिक्रिया

ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.  

Updated: Jul 31, 2020, 07:00 PM IST
Sushant Suicide Case: ईडीच्या कारवाईनंतर रियाची पहिली प्रतिक्रिया  title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याने आत्महत्या का केली. याचात कसून शोध सध्या पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ४० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे. आता याप्रकरणाची चौकशी बिहार पोलीस देखील करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे याप्रकरणी खुद्द अभिनेत्री रिया चक्रवर्तीने प्रतिक्रिया दिली आहे. 

ती म्हणाली, 'मला विश्वास आहे की मला न्याय मिळेल. भले माझ्या विरोधात सध्या प्रसार माध्यमांमध्ये अनेक वाईट बातम्या प्रसारित होत आहेत. माझ्या वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यावर कोणताही खुलासा करणार नाही. सत्यमेव जयते... अखेर सत्याचा विजय होईल..' असं म्हणतं तिने  तिच्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या कारवाईनंतर रियाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  

पाटण्यामधील राजीव नगर पोलीस स्थानकात सुशांतच्या वडिलांनी त्याची प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एक तक्रार दाखल केली. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यामुळं आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे.