बॉलिवूडच्या 'या' पाच हॉरर सिनेमांचा बॉक्स ऑफिस धुमाकूळ

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत हॉरर सिनेमांनी आपली एक वेगळीच जागा बनवली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 4, 2018, 05:17 PM IST
बॉलिवूडच्या 'या' पाच हॉरर सिनेमांचा बॉक्स ऑफिस धुमाकूळ title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत हॉरर सिनेमांनी आपली एक वेगळीच जागा बनवली आहे.

बॉलिवूडमध्ये पहिला हॉरर सिनेमा १९४९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं नाव महल होतं आणि त्यामध्ये अशोक कुमार, मधुबाला यांनी मुख्य भूमिका केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. मात्र, यानंतर प्रदर्शित झालेल्या इतर हॉरर सिनेमांना प्रेक्षकांनी जास्त पसंद केलं नाही. त्यामुळे हॉरर सिनेमा बनवण्याचं प्रमाणही कमी होत गेलं. 

गेल्या पाच वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये जवळपास २० हॉरर सिनेमे बनवण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ २-३ सिनेमाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यासोबतच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या सिनेमांत सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे अभिनेत्री बिपाशा बासु यांच्या 'राज ३' सिनेमाचं.

राज ३

या सिनेमाची स्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यासोबतच सिनेमाचं म्युझिकही खूपच चांगलं होतं. सिनेमाचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केलं आहे आणि हा सिनेमा २ डी सोबतच ३ डी मध्येही रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७० कोटींचा गल्ला जमवला होता.

रागिनी एमएमएस २

अभिनेत्री सनी लिओनीच्या या सिनेमाची प्रेक्षक खूप वाट पाहत होते. कारण, या सिनेमाचा ट्रेलर आणि बेबी डॉल या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सिने समिक्षकांकडून चांगला रिव्ह्यू मिळाला नसतानाही हा सिनेमा हिट ठरला. या सिनेमाने ४६ कोटींचा गल्ला जमवला.

राज द मिस्ट्री कॉन्टिन्यूअस

राज या सिनेमाचा सीक्वल बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या सिनेमात इमरान हाशमी आणि कंगना राणावत मुख्य भूमिकेत होते. सिनेमाचं बजेट जवळपास १० कोटी होतं आणि सिनेमाने ३१ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे हा सिनेमा हिट सिनेमांच्या यादीत पोहोचला.

हॉन्टेड 

हा सिनेमा २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमा ३ डी असल्याने अनेकांनी तो पाहिला. सिनेमाचं बजेट १३ कोटी असातना ३६ कोटींचा गल्ला जमवला.

१९२० ईविल रिटर्न्स

हा सिनेमा १९२० या सिनेमाचा सीक्वल आहे आणि या सिनेमात अफ्ताब शिवदासिनी, टिया बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २३ कोटींची कमाई केली होती.