राहुल गांधी यांच्यासोबत करायचं आहे बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीला लग्न; ओळखलं का?

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशीच अभिनेत्री आहे जिने राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. 

Updated: Feb 11, 2024, 04:28 PM IST
राहुल गांधी यांच्यासोबत करायचं आहे बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीला लग्न; ओळखलं का?

मुंबई : अशा अनेक एक्ट्रेस आहेत ज्या सिनेमांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत असतात. त्यातलीच एक शर्लिन चोपडा आहे. जी सोशल मीडिया कायम सक्रिय असते. याचबरोबर शर्लिन तिच्या बेधडक वक्तव्यामुंळेही कायम चर्चेत असते. शर्लिन तिच्या वक्तव्यांमुळे कायम हेडलाईन्समध्ये असते. आज पर्यंत शर्लिनने अनेक सिनेमामंध्ये झळकली आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चर्चेत राहण्यासाठी काहीही करतात त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा आहे. ड्रामा क्वीन म्हटलं तर तुमच्या तोंडात राखी सावंतच नाव येईल. पण जेव्हा शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर चर्चेत येवू लागली तेव्हा तिलाही ड्रामा क्वीन म्हटलं जातं.

Add Zee News as a Preferred Source

शर्लिन कायम तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते आणि कोणत्याही टॉपिकवर बोलायला शर्लिन कधीच मागे पुढे पाहत नाही. सोशल मीडियावर शर्लिन नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शर्लिन सोशल मीडियावर कायमच काही ना काही शेअर करते असते. कधी शर्लिन स्वत:चे व्हिडीओ तर कधी फोटो शेअर करतना दिसते. २०२३ साली एका एका बातमीने खळबळ माजवली होती. ज्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की, शर्लिन चोप्रा एका अटी अनुसार कॉंग्रेस नेता राहुल गांधीसोबत लग्न करु शकते. तिचं ते वक्तव्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार शर्लिन चोपडाला जेव्हा पापाराझींनी विचारलं की, तुम्हाला राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करायला आवडेल का? यावर शर्लिनने सांगितलं की, हो मी निसंकोचपणे करेन मात्र माझी एक अटे आहे. मी लग्नानंतर माझं आडनाव नाही बदलणार. जर राहूल यांना हे मान्य असेल तक मी लग्न करायला तयार आहे. तिने हे वक्तव्य गंमतीशीरपणे मीडियासमोर केलं होतं. ३९ वर्षीय अभिनेत्री अभिनेत्री शर्लिन चोपडा आता कुमारिका आहे. मात्र तिच्या अफेअरचे किस्से अनेक अभिनेत्यांसोबत समोर आले आहेत. मात्र शर्लिनने कधीही तिच्या रिलेशनशिपबद्दल उघडपणं सांगितलं नाही.

अभिनेत्री शार्लिनचा जन्म ११ फेब्रुवारी १९८४ साली हैद्राबामध्ये झाला. २००५ साली आलेला टाईमपासमधून अभिनेत्रीने डेब्यू केला आहे. यानंतर तिने   कामसूत्र, रेड स्वास्तिक, वजह तुम हो, जवानी-दीवानी, रकीब, नॉटी बॉय सारख्या सिनेमात अभिनेत्री काम केलं आहे. शर्लिनने २००२ मध्ये अमेरिकन सिनेमा Beeper मधून तिच्या फल्मी करिअरला सुरुवात केली होती. शर्लिनने इंग्लिश सिनेमाऐवजी हिंदी, तमिल आणि तेलुगू भाषांच्या सिनेमात काम केलं आहे. शर्लिन समाजच्या अनेक मुद्द्यांवर बोलताना कायम दिसते. शर्लिन चोपडा तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे असे फोटो दिसतील ज्याचे फोटोशूट अभिनेत्री कामच करत असतात. 

About the Author