18 वर्ष लहान मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत Live-In मध्ये राहतो ‘हा’ बॉलिवूड अभिनेता

Bollywood Actor dating Marathi Actress : हा बॉलिवूड अभिनेता करतोय वयानं 18 वर्षे लहाण असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट, तुम्ही ओळखू शकता का?.

दिक्षा पाटील | Updated: Sep 27, 2023, 04:03 PM IST
18 वर्ष लहान मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत Live-In मध्ये राहतो ‘हा’ बॉलिवूड अभिनेता title=
(Photo Credit : Social Media)

Bollywood Actor dating Marathi Actress : बॉलिवूड अभिनेता राहुल देवची ओळख करूण देण्याची काही गरज नाही. राहुल देवनं काहीच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांचे लाखो चाहते आहेत. राहुल देव कामापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. आज राहुल देव यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही जाणून घेऊया. राहुल देव यांच्या रिलेशनशिपविषयी अनेकांना माहित आहे. वयानं 18 वर्षे लहाण असलेल्या अभिनेत्री मुग्धा गोडसेसोबत ते रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी जेव्हा त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितले होते तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झाले होते. फक्त इतकंच नाही तर सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु होती. 

राहुल यांनी 1998 मध्ये रीना यांच्याशी लग्न केले होते. त्यावेळी राहुल हे कलाकार देखील नव्हते. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव सिद्धार्थ असे होते. पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. त्याचे कारण रीना यांना झालेले कर्करोगाचे निदान आहे. त्यांनी कर्करोगाला लढा देण्याचा प्रयत्न केला पण लग्नाचा 11 वर्षाचा सुखी संसारानंतर म्हणजेच 2009 मध्ये रीना यांचे निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर राहुल पूर्णपणे एकटे पडले होते. तेव्हा राहुल यांच्या आयुष्यात अभिनेत्री मुग्धा गोडसेनं एन्ट्री केली होती. रीना यांच्या निधनाच्या चार वर्षांनंतर म्हणजेच 2013 मध्ये राहुल आणि मुग्धा पहिल्यांदा भेटले.  राहुल आणि मुग्धा यांच्या वयात तब्बल 18 वर्षांचा फरक आहे. ते पहिल्यांदा एकटे भेटल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MugdhaVeiraGodse (@mugdhagodse)

2015 मध्ये सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी त्यांच्या रिलेशनशिपला जगजाहिर केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी त्यांच्या मुलाला सांगायला संकोच करत होते. पण जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला हे कोणापासून लपवून ठेवण्याची गरज वाटली नाही. 

हेही वाचा : Oscars : बॉलिवूड नाही तर 'या' मल्याळम चित्रपटाला मिळाली ऑस्करमध्ये एन्ट्री!

दरम्यान, आजही दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. अद्यापही दोघांनी लग्न केलेलं नाही. ‘आम्हाला लग्नाची गरज नाही… कारण आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत…’ असं वक्तव्य राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांनी केलं होतं. आज दोघे त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत.