'डुक्करासारखं खातो आणि श्वानासारखा...', सलमान खानसंदर्भात अभिनेत्याचं धक्कादायक विधान

Salman Khan : सलमान खानविषयी बॉलिवूडमधील या अभिनेत्यानं केलं धक्कादायक वक्तव्य, डुक्कर आणि श्वानाचा उल्लेख करत म्हणाला...

दिक्षा पाटील | Updated: Mar 9, 2024, 11:59 AM IST
'डुक्करासारखं खातो आणि श्वानासारखा...', सलमान खानसंदर्भात अभिनेत्याचं धक्कादायक विधान title=
(Photo Credit : File Photo)

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चाहत्यांची यादी फार मोठी आहे. सलमान त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या दयाळू स्वभावासाठी ही ओळखला जातो. कोणीही मदत मागितली की सलमान हा त्याच्यासाठी धावून जातो. अशात सलमानचा खास मित्र विंदू दारा सिंह जो कॉलेजपासून त्याचा खास मित्र आहे. त्यांनी सलमानविषयी एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. याशिवाय त्यानं सांगितलं की सलमान त्याला मिळणाऱ्या पॉकेट मनीचं नक्की काय करतो. 

विंदू दारा सिंगनं नुकतील सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सलमानविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यानं सलमान त्याच्या पॉकेटमनीचं काय करतो हे देखील सांगितलं. विंदूनं सांगितलं की सलमान खान म्हणाला होता की 'त्यानं जेव्हा माझी बॉडी पाहिली त्यानंतर त्यानं वर्कआऊट करण्यास सुरुवात केली होती. मी नेहमीच त्याला एक गोष्ट सांगतो की तो ते जास्त करतोय. तो डुक्करासारखं खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम करतो. सलमान जितकं खातो त्यानंतर आम्ही त्याला विचारलं की भाई सगळं जेवणं जातं कुठे? त्यावर त्याचं नेहमी एकच उत्तर असतं की तो त्याला बर्न करतो. खरंच संध्याकाळी करत असलेल्या वर्कआऊटमध्ये सलमान हेच करतो. मी खरंच सलमानवर खूप प्रेम करतो. तो खूप चांगला आणि मदत करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे.'

वडिलांकडून आजही घेतो पॉकेटमणी? 

विंदूनं पुढे सांगितलं की 'सलमान खान आणि तो लहाणपणीचे मित्र आहेत. एक अभिनेता असण्यासोबतच ते एक चांगला माणूसही आहे. सलमान आज कोटींमध्ये पैसे कमावत असला, तरी आजही तो त्याचे वडील सलीम खान यांच्याकडून रोज पॉकेट मनी घेतो.'

मिळालेल्या पॉकेटमनीचं सलमान काय करतो?

सलमानला पॉकेटमनी मिळालेल्या पैशांविषयी सांगत विंदू पुढे म्हणाला, 'हे पैसे घेऊन सलमान त्याचा असिस्टंट नदीमकडे देतो. मग त्याचे वडील त्याला 50 हजार देओ किंवा मग 1 लाख. ते सगळे पैसे तो गरीबांमध्ये वाटतो आणि आजही हे असंच सुरु आहे.'

हेही वाचा : अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान' नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई

सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याला चित्रपटसृष्टीत 34 वर्ष पूर्ण झाली आहेत.