'पुष्पा' 2 मध्ये या बॉलिवूड स्टारची होणार एन्ट्री

पुष्पा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली. सिनेमाचा पुढचा भाग पाहण्यासाठी लोकांमध्ये ही उत्सूकता आहे.

Updated: Jul 20, 2022, 05:11 PM IST
'पुष्पा' 2 मध्ये या बॉलिवूड स्टारची होणार एन्ट्री title=

मुंबई : रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन स्टार सिनेमा पुष्पा द राइज 2021 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या पॅन इंडिया चित्रपटाने प्रेक्षकांवर मनावर छाप सोडली. नुकतीच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. फहाद फाजिलनंतर या चित्रपटाशी आणखी एका अभिनेत्याचे नाव जोडले जाणार आहे. (Manoj Vajpayee in Pushpa 2)

पुष्पा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर केवळ एक महिन्यानंतर प्रदर्शित झाला होता, परंतु असे असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, दुसऱ्या भागात काय खास असणार आहे, याची कथा जाणून 

घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.पुष्पा द रुलचे कथानक आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आले आहे. पण चित्रपटात कोणते नवीन कलाकार असतील याबाबत काही माहिती पुढे आली आहे. बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता मनोज बाजपेयी देखील या चित्रपटाचा एक भाग असणार असल्याच्या बातम्या आहेत.

रिपोर्ट्सनुसार, पुष्पाच्या निर्मात्यांनी एका खास भूमिकेसाठी मनोज बाजपेयीशी संपर्क साधला आहे. ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका असू शकते. मनोज बाजपेयी हा उत्तम कलाकार आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनसोबत स्क्रिन शेअर करताना पाहणे चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नसेल.