बेडवर झोपलेली ही चिमुकली आज करते कोरोडोंच्या हृदयावर राज्य, तिला तुम्ही ओळखलंत का?

 सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत सेलिब्रिटींच्या बालपणीचे अनेक फोटो पाहिले असतील. 

Updated: May 16, 2022, 06:08 PM IST
  बेडवर झोपलेली ही चिमुकली आज करते कोरोडोंच्या हृदयावर राज्य, तिला तुम्ही ओळखलंत का? title=

मुंबई : सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत सेलिब्रिटींच्या बालपणीचे अनेक फोटो पाहिले असतील. त्यांच्या चाहत्यांना या स्टार्सचे बालपणीचे फोटो पाहायला आवडतात. स्टार्सबद्दलची छोटीशी माहिती जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. अनेक फॅन पेजवर या स्टार्सना त्यांचे बालपणीचे फोटो शेअर करून ओळखण्याचं आव्हान दिलं जातं. अशाच एका बॉलीवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो पाहिल्यानंतर तुम्हीही डोकं वर काढाल. खरंतर, बहुतेक लोकं या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखू शकत नाहीयेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक मुलगी निळ्या रंगाचा फ्रॉक घातलेली बेडवर पडलेली दिसत आहे. मुलगी खूप गोंडस आहे  झोपून हसत आहे. मुलीचा गोंडसपणा पाहून लोकं तिच्यावर भारावून जात आहेत. खरंतर, केवळ काही लोकं नावाचा अंदाज लावू शकले आहेत. तुम्हालाही अजून तिला ओळखता आलं नसेल, तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनुष्का शर्मा आहे. अनुष्का शर्मा आजच्या काळात बॉलिवूडमधील नंबर वन अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का आज एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेते.

विशेष म्हणजे अनुष्का शर्माने क्रिकेट स्टार विराट कोहलीसोबत लग्न केलं आहे. दोघांना वामिका नावाची मुलगी देखील आहे. काही काळापूर्वी वामिकाचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला होता. ज्यामध्ये ती हुबेहुब तिचे वडील विराटसारखी दिसत होती. तर अनुष्का शर्माचा हा बालपणीचा फोटो कसा वाटला? आम्हाला कमेंट करून कळवा.