या कारणाने इम्रान आश्मीला आवडली 'बादशाहो' चित्रपटाची कथा !

बॉलिवूड अभिनेता इम्रान आश्मी आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांनी एका मुलाखतीत 'बादशाहो' चित्रपटाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 31, 2017, 06:55 PM IST
या कारणाने  इम्रान आश्मीला आवडली 'बादशाहो' चित्रपटाची कथा ! title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता इम्रान आश्मी आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांनी एका मुलाखतीत 'बादशाहो' चित्रपटाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली.

याबद्दल बोलताना इम्रान आश्मी म्हणाला की, "या चित्रपटामुळे लोक फक्त मला हॉट आणि किस सीन्ससाठी नाही तर अॅक्शनसाठी देखील ओळखतील." त्याचबरोबर तो म्हणाला की, ''मला फक्त रोमॅन्टिक नाही तर वेगळ्या प्रकारचे सिनेमे देखील करायचे आहेत.  ईशा गुप्ताने तिच्या आगामी चित्रपटाबद्दल चर्चा केली. तिचा आगामी चित्रपट एन्टरटेनिंग असण्याबरोबरच तो चित्रपट म्हणजे एक परिपूर्ण पॅकेज आहे. ईशाने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले. त्याबद्दल देखील ती मोकळेपणाने बोलली. 

हा चित्रपट १ सेप्टेंबरला प्रदर्शित होणार असून यात अनेक दिग्गज स्टार्स आहेत. इम्रान आश्मी, इशा गुप्ता यांच्याव्यतिरिक्त अजय देवगन, इलियाना डिक्रूज आणि विद्यूत जामवाल हे सेलेब्रिटी मुख्य भूमिकेत आहेत.