माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमात 'या' अभिनेत्याची वर्णी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता 

Updated: Oct 9, 2019, 10:11 AM IST
माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमात 'या' अभिनेत्याची वर्णी title=

मुंबई : माधुरी दीक्षित आपले आगामे प्रोजेक्ट्स घेऊन सिनेसृष्टीत येत आहे. '15 ऑगस्ट' या सिनेमानंतर आता 'पंचक' हा सिनेमा घेऊन माधुरी दीक्षित येत आहे. या सिनेमात एका मराठमोळ्या कलाकाराची वर्मी लागली आहे. हा अभिनेता माधुरी दीक्षित यांच्यासोबत दुसऱ्यांदा काम करणार आहे. 

हा अभिनेता आहे आदिनाथ महेश कोठारे. आदिनाथ यांचा माधुरी दीक्षित यांच्यासोबत हा दुसरा प्रोजेक्ट आहे. '15 ऑगस्ट' या सिनेमातही आदिनाथ यांनी काम केलं आहे.  या अगोदर 'पाणी' या सिनेमालाचं दिग्दर्शन केलं आहे. एवढंच नव्हे तर या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्काराची मोहिम देखील लागली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

One of India’s greatest batsmen ! Specially known for his immaculate form and technique ! It’s going to be an honour and a challenge to portray this legend, ‘Colonel’ Dilip Balwant Vengsarkar on the silver screen in @83thefilm !!! 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

आदिनाथ कोठारे आता आपल्याला '83' या सिनेमात क्रिकेटर दिलीप वेंगेसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिनाथ यांच्याकडे एकापेक्षा एक चांगले प्रोजेक्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. असं असताना आता 'पंचक' या सिनेमाचं देखील काम सुरू झालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

And it’s a wrap to an incredible journey etched into our lives forever ! @83thefilm #wrapupparty #aboutlastnight

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

माधुरी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुहूर्ताचा व्हिडिओ पोस्ट केला होता. पण तो तात्काळ काढण्यात आला कारण अद्याप या सिनेमाची जाहिर घोषणा झालेली नाही. हा सिनेमात मल्टीस्टारर असून आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#somethingnew #workingwiththelegend

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

तसेच जयंत जठार या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या अगोदर जठार हे 'कच्चा लिंबू', 'नटरंग' आणि 'फॅमिली कट्टा' सिनेमांशी जोडले गेले आहेत. आता माधुरी फक्त या सिनेमाची निर्मिती करणार की अभिनय देखील याकडे सगळ्यांच लक्ष आहे.