'हे' मराठी स्टार किड्स सोशल मीडियावर हिट

प्रेक्षक यांना पाहण्यासाठी आतुर 

'हे' मराठी स्टार किड्स सोशल मीडियावर हिट  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये स्टार किड्स लोकप्रिय होण्याचा ट्रेंड आहे. सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलं देखील सोशल मीडियावर हिट आहेत. आता असाच प्रकार आपल्याला मराठी सिनेसृष्टीतही पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये तैमूर, अबराम, मिशा, जान्हवी कपूर ही मुलं लोकप्रिय आहेत. आता यांच्या जोडीला मराठी सिनेसृष्टीतील मुलं ही लोकप्रिय होत आहे. आपल्या मराठी कलाकारांच्या मुलांची नावे जाणून घेण्यात मराठी प्रेक्षकांना देखील रस असतो. ही मुलं काय करतात, याच्या सवयी कशा आहेत. त्यांचे फोटो पाहण्यात प्रेक्षक खास उत्सुक असतात. 

यामध्ये अग्रस्थानी आहे जिजा... आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकरची मुलगी. कोठारे कुटुंबात एका गोंडस मुलीचं आगमन झालं. जिजाचं बारसं अगदी शिवाजी महाराजांच्या काळाप्रमाणे करण्यात आलं. जिजा हे नाव देखील हटके असल्यामुळे चाहते भरपूर घोष झाले. आदिनाथ आणि उर्मिला दोघेही जिजाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. 

 

Waking up to this bundle of joy be like... #happyfathersday

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

Super excited to meet Daddy @adinathkothare #daddysgirl #mommylove #babyontheway

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

जिजाप्रमाणेच आणखी एका कलाकाराची मुलगी लोकप्रिय होत आहे. ती म्हणजे फेलिशा पुष्कर जोग. पुष्कर जोगच्या घरी जानेवारी 2018 मध्ये एका चिमुकलीचं आगमन झालं. फेलिशा देखील सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.

जिजा, फेलिशा प्रमाणेच चर्चा आहे ती श्रेयस तळपदेच्या मुलीची. आध्या असं श्रेयसच्या गोंडस मुलीचं नाव आहे. श्रेयसने मराठी मालिकांपासून सुरूवात केली मात्र आता बॉलिवूडमध्ये उत्तम अभिनेता म्हणून श्रेयसने नाव कमावलं आहे. श्रेयसने बॉलिवूडमध्ये हिट सिनेमे दिले आहेत. श्रेयसप्रमाणे आता त्याची मुलगी आध्या देखील लोकप्रिय होत आहे. 

श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून एका चिमुकलीचे आगमन झालं आहे. श्रेयस आणि दीप्ती हे १३ वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकले होते. मे महिन्याच्या अखेरीस हे दोघेही फिरायला निघाले होते. विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांच्या मुलीला सरोगसीच्या मदतीने जन्म देणार्‍या मातेला प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे हॉलिडे प्लॅन रद्द करून ते परतले.

स्वप्नील जोशी आपल्या मायराचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतो. मायरा ही स्वप्नील जोशीची मोठी मुलगी आहे. 2017 डिसेंबरमध्ये स्वप्नीलच्या घरी एक चिमुकला आहे. स्वप्नीलला दुसरा मुलगा आहे. राघव असं या मुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

त्याचप्रमाणे चला हवा येऊ द्यामधून लोकप्रिय झालेला कुशल बद्रिकेदेखील आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

 

“अनुभवाचे बोल” तसे माझ्या घरी खुप पैसे नसले तरी गल्ले मात्र बरेच आहेत. “Piggy bank”  भविष्यात भरपूर पैसे आले तर कुठे ठेवायचे ह्याची, तरतूद आधी करून ठेवली आहे. आज त्यात आणखीन एकाची भर, “टाकाऊ पासुन टिकाऊ” ह्या गंधारच्या school project अंतर्गत मी, सुनयना आणी गंधारने बनवलेल्या ह्या गल्यातून पैसे किती मिळतील माहीत नाही पण आनंद खुप मिळाला, कुठल्याच piggybank मध्ये मावणार नाही एवढा. आठवणींच्या साठवणीतलं एक पान वाढलं. अनुभवावरून सांगतो, “टाकाऊ पासुन, टिकाऊ गोष्टी तयार होतात”!!

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

या सेलिब्रिटींची मुली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.